इन्फोसिस कर्मचारी बनणार करोडपती


देशातील दिग्गज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिस त्यांच्या कर्मचारी वर्गाला करोडपती बनविण्याच्या विचारात आहे. कंपनीतील सेवकवर्गाने कंपनी सोडून जाऊ नये यासाठी नवी योजना आखली जात असून त्यानुसार कर्मचाऱ्यांना कंपनी शेअर्स देणार आहे. या कर्मचारी वर्गाचा फायदा आहे तसेच कंपनीचाही फायदा आहे. या संदर्भात कंपनीने एक निवेदन जारी केले असून कंपनी बोर्डाने एक्स्पेडंट स्टॉक ओनरशिप प्रोग्राम २०१९ ला मंजुरी दिली असल्याचे स्पष्ट केले आहे. या योजनेनुसार ३७०० कोटी रुपये किमतीचे ५ कोटी शेअर्स कर्मचाऱ्यांना वाटले जाणार आहेत. सीइओ सलील पारेख यांना १० कोटींचे तर सीओओ युबी प्रदीप राव यांना ४ कोटीचे शेअर इंसेंटिव्ह म्हणून दिले जाणार आहेत.


गेल्या काही वर्षात कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण इन्फोसिस मध्ये खूपच वाढले आहे. कर्मचारी वर्गाने दीर्घकाळ कंपनीत राहावे यासाठी नव्या योजना आखल्या जात आहेत. गेल्या वर्षात कंपनी सोडून जाण्याचा वेग २० टक्क्यांवर गेला असून भविष्यात तो अधिक वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वास्तविक चागले काम करणाऱ्या कर्मचार्यांना कंपनी १९९५ पासूनच शेअर देत आहे. स्टॉक ओनरशिप प्रोग्राम खाली ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेअर दिले जाणार आहेत मात्र दिल्यानंतर हे शेअर किमान ७ वर्षे विकता येणार नाहीत.

इन्फोसिसचे सीईओ सलील पारीख म्हणाले कर्मचारी हीच आमची खरी संपत्ती आहे. कंपनी स्टॉक ऑप्शन देऊन कर्मचार्यांनी नेहमी आमच्यासोबत राहावे हीच आमची इच्छा आहे. यातून त्यांनाही फायदा मिळणार आहे. सध्या ५ कोटी शेअर्स दिले जाणार आहेत आणि कंपनीच्या शेअरधारक वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांचे अनुमोदन घेतले जाणार आहे.

Leave a Comment