सांबाच्या मुली करणार बॉलीवूड डेब्यू


अनेक विक्रम नोंदविलेल्या शोले या सिनेमात सांबाची भूमिका साकारलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात आजही त्याची आठवण ताजी असलेल्या मॅकमोहन या अभिनेत्याच्या मुली मंजरी आणि विनती बॉलीवूड डेब्यू साठी सज्ज झाल्या आहेत. बॉलीवूड सितारयांच्या मुलीनी सध्या बॉलीवूड मध्ये एकाच धमाल चालविली आहे. श्रीदेवीच्या जान्हवीने धडक मधून तर सैफ अली खानच्या साराने केदारनाथ मधून बॉलीवूड एन्ट्री घेतल्यावर आता चंकी पांडेची मुलगी अनन्या स्टुडंट ऑफ द इअर २ मधून प्रेक्षकांना सामोरी आली आहे. सांबाच्या मुली अभिनय क्षेत्रात नाही तर दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात उतरत आहेत.

विनती या संबंधी बोलताना सांगते, ती स्केटबोर्डवर आधारित एक फिल्म तयार करत असून डेझर्ट डॉल्फिन या नावाने हा चित्रपट बनविला जात आहे. स्केटबोर्ड वर आधारित भारतातील हा पहिलाच चित्रपट आहे असा तिचा दावा आहे. विनती या चित्रपटाची निर्मिती करणार आहे तर मंजरी दिग्दर्शन करणार आहे.

राजस्थान मधील प्रेरणा नावाच्या मुलीवर या चित्रपटाची कथा आधारली आहे. प्रेरणा गावातील कालबाह्य परंपरा संपविण्यासाठी प्रयत्न करते आहे अश्यात तिची भेट एका ग्राफिक आर्टिस्ट बरोबर होते. ती प्रेरणाला स्केट बोर्डिंगचे स्वप्न दाखविते. आणि त्यातून ही कथा फुलते. चित्रपटाच्या शुटींग साठी उदयपुरच्या जवळ असलेल्या खेमपूर येथे १४५०० चौरस फुटाचे स्केटिंग मैदान तयार केले गेले आहे.

अर्थात मंजरी आणि विनंती यांनी यापूर्वीही बॉलीवूडमध्ये काम केले आहे. मंजरीने डंकर्क, द डार्क नाईट रायझेस, वंडर वूमन, मिशन इंम्पॉसिबल चित्रपटात सहाय्यक निर्माती म्हणून काम केले असून विनतीने सात खून माफ, वेक अप सिद मध्ये काम केले आहे.

Leave a Comment