शाहरुख खानसोबत पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्री सध्या काय करतात


एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करणे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान. आज बॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोण आणि अनुष्का शर्मा या शाहरुखसोबत बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जातात. पण शाहरुख सर्वांसाठीच लकी ठरलेला नाही. बॉलिवूडमध्ये अशा देखील काही अभिनेत्री आहेत ज्यांनी शाहरुखसोबत बॉलिवूड पदार्पण केले, पण त्या बॉलिवूडमध्ये कुठेही दिसत नाहीत. अशाच अभिनेत्रींची माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

बॉलिवूडमध्ये 2017 साली शाहरुखचा बिग बजेट चित्रपट ‘रईस’मधून पदार्पण करणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. पण पाकिस्तानी कलाकारांवर भारत-पाकिस्तानच्या तणावग्रस्त संबंधांमुळे भारतात बंदी घालण्यात आली आणि यासोबत माहिराचे बॉलिवूड करिअर या चित्रपटानंतर संपले.

शाहरुखच्या ‘फॅन’ चित्रपटातून मराठी सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील बहुचर्चित जोडी सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी श्रिया पिळगांवकरनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नाही. श्रिया त्यानंतर बॉलिवूडमधून गायब झाली. काही दिवसांपूर्वी अमेझॉनची सुपरहिट वेब सीरिज मिर्जापूरच्या पहिल्या सीझनमध्ये ती दिसली होती.

जवळपास 10 अभिनेत्रींनी 2007 मध्ये आलेल्या चक दे इंडिया चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते त्यातील काही ठराविक अभिनेत्री सोडता इतर सर्व अभिनेत्री बॉलिवूडमध्ये जशा आल्या तशा अचानक गायबही झाल्या. या चित्रपटातून तान्या अबरोल, आर्या मेमन, अनायथा नायर, शुभी मेहता, चित्राशी रावत, किम लालद्वाला, मेसोचोन जिमिक या अभिनेत्रींनी बॉलिवूड डेब्यू केला होता. मात्र या चित्रपटानंतर त्या बॉलिवूडमधून हळूहळू गायब झाल्या.

अभिनेत्री गायत्री जोशी शाहरुखच्या 2004मध्ये आलेल्या ‘स्वदेस’ या एकमेव चित्रपटात झळकली होती. गायत्रीने या चित्रपटानंतर हॉटेल व्यावसायिक विकास ओबेरॉयशी लग्न केले आणि त्यानंतर आपल्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी गायत्रीने बॉलिवूडला अलविदा केले. ती याआधी एक सुप्रसिद्ध मॉडेल होती. तसेच सोनाली बेंद्रे, सुझान खान आणि ट्विंकल खन्ना यांची ती बेस्ट फ्रेंड आहे.

बॉलिवूडमध्ये 1997 मध्ये आलेल्या परदेस चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या महिमा चौधरीला या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. तिने त्यानंतर ‘दिल क्या करे’, ‘धडकन’, ‘खिलाडी 420’ या सारख्या चित्रपटात काम केले. पण चित्रपटांची निवड महिमाची चुकली. जवळपास 10 चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकत दिसलेल्या महिमाचे हे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. तिने 2015-16मध्ये बॉलिवूडमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न केला मात्र तिचा ‘चॉकलेट’ हा चित्रपटाही फ्लॉप ठरला.

बॉलिवूडमध्ये 1994साली शाहरुखसोबत पदार्पण करणाऱ्या सुचित्रा कृष्णमूर्तीने आपल्या काही अटींसोबत बॉलिवूडला अलविदा केले. काही मोजक्या भूमिका सुचित्राने साकारल्या. तिने 25 वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दित फक्त 8 चित्रपटांमध्ये काम केले. ती काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘रॉ’मध्ये दिसली होती. याशिवाय तिचे ‘ड्रामा क्वीन’ हे नाटक खूप गाजले.

Leave a Comment