आज थंडावणार शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा


नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर प्रचारावर एक दिवस आधीच बंदी घातल्यामुळे १७ मे रोजी संध्याकाळपर्यंतच पश्चिम बंगाल सोडून ८ राज्यांमध्ये प्रचार सुरू राहील.

पश्चिम बंगालमधील ९ जागांवर लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या १९ मे रोजी बंगालमधील कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर, डमडम, बारासात, बशिरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जाधवपूर या ९ ठिकाणी मतदान होणार आहे. नियमानुसार ४८ तास आधी हा प्रचार सायंकाळी बंद होणार होता. पण १६ मेच्या रात्री १० वाजल्यापासूनच येथील प्रचार बंद करण्याचा आदेश आयोगाने दिला. या निर्णयामुळे विरोधी पक्षांनी आयोगावर टीका केली.

Leave a Comment