हा आहे ख्रिस गेलचा फिटनेस फंडा


बार्बाडोस – आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आणि पाचवा विश्वचषक वेस्टइंडिजचा विस्फोटक ३९ वर्षीय फलंदाज ख्रिस गेल खेळणार आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तो सध्या नवा फंडा वापरत आहे. यासाठी त्याने सध्या जीममध्ये जाणे देखील बंद केले असून योगावर तो जास्त भर देत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून ख्रिस गेल जीमपासून दूर आहे. त्याने थकवा दूर करण्यासाठी योगाला जवळ केले आहे. भरदार शरीरयष्टी असलेला गेल जीमला न जाता विश्रांती करण्यावर अधिक भर देतो. त्याने या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये ४९० धावा केल्या आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल बोलताना तो म्हणाला, माझ्या बॅटमधून धावा निघत आहेत. माझ्याकडे खूप अनुभव आहे. मी माझ्या फलंदाजीवर समाधानी आहे. मला आशा आहे, की हीच लय विश्वचषकात कायम राहिल.

मी गेल्या दोन महिन्यांत शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी जास्त लक्ष दिलेले नाही. मी सध्या जीमलाही जात नाही. विश्रांती घेत असून मालिश करण्यावर भर देत आहे. तसेच स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुढे बोलताना गेल म्हणाला, माझ्या फॅन्ससाठी मी क्रिकेट खेळत आहे. माझ्या डोक्यात काही दिवसांपूर्वी फक्त निवृत्तीचा विचार होता. पण माझ्या चाहत्यांनी मला अजूनही क्रिकेट खेळावे, अशी विनंती केली. मी क्रिकेट त्याच्यासाठीच खेळत असल्याचेही गेल म्हणाला.

Leave a Comment