इच्छा असूनही या अभिनेत्री कधी होऊ शकल्या नाहीत आई


बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अधिराज्य गाजवले. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कामे केली आणि पैसा, प्रसिद्धीदेखील कमावली. पण त्यांचे खऱ्या आयुष्यात या सगळ्यात आई व्हायचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. आम्ही तुम्हाला आज काही अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांना कधीच मातृत्व लाभू शकले नाही.

‘अंकुर’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘मासूम’, ‘अर्थ’, ‘अवतार’ अशा एकाहून एक सरस चित्रपटांत शबाना आझमी यांनी काम केले. त्यांनी १९८४ मध्ये गीतकार जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले. ३५ वर्ष दोघांच्या लग्नाला झाली. शबाना कधीही आई होऊ शकल्या नाहीत. पण फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही दोन सावत्र मुले त्यांना आहेत.

बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावल्यानंतर १९९६ मध्ये माजी ‘मिस इंडिया’ संगीत बिजलानीने भारताचा माजी कर्णधार मोहम्मज अजरुद्दीनशी लग्न केले. दोघांनी १६ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. संगीतालाही मुल झालेले नाही.

वयाच्या १६ व्या वर्षी अभिनेत्री सायरा बानो यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी ‘जंगली’, ‘पडोसन’, ‘आदमी और इंसान’, ‘गोपी’ अशा एकाहून एक हिट चित्रपटांत एकत्र काम केले. तब्बल ५३ वर्ष दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाला झाली. पण दोघांना कधीही मुल झाले नाही.

८० च्या दशकापासून ९० च्या दशकापर्यंत बॉलिवूडमध्ये जया प्रदाचे नाणे खणखणीत चालायचे. जया प्रदा यांनी चित्रपटांतून पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर १९८६ मध्ये निर्माते श्रीकांत नाहटाशी लग्न केले. जया या आई होऊ शकत नव्हत्या. त्यामुळे एका मुलाला त्यांनी दत्तक घेतले. जया या सध्या बॉलिवूडपासून दूर असल्या तरी राजकारणात त्या सक्रिय झाल्या आहेत. त्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून रामपुर येथून निवडणूक लढवत आहेत.

Leave a Comment