या जोडप्याने घर विकून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आता दरमहा कमावत आहेत 1 कोटी रुपये


व्यवसाय करायचा कधी विचारही चुंबकची सह संस्थापक शुभ्रा चड्डाने केला नव्हता. त्यांच्याकडे व्यवसाय करण्यासाठी आयडिया होती, पण गलेलठ्ठ पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडण्याची हिंमतही त्यांच्यात नव्हती. पण आपल्या मुलीच्या जन्मानंतर त्यांनी 2008मध्ये ब्रेक घेतला. व्यवसायाबद्दल विचार करण्याची हीच वेळ होती. पण त्यांना सहा महिन्यातच व्यवसायात नुकसान झाले. तेही प्रचंड नुकसान होते. त्यांच्या पतीने कठीण प्रसंगी त्यांना साथ दिली. देशात आता चुंबक ब्रँडचे 17 स्टोअर्स आणि ई कॉमर्स शॉपिंग प्लॅटफॉर्म आहेत. तयार कपडे, बॅग्स, गिफ्ट्स, दागिने, होम डेकोर अशांसारखी उत्पादने चुंबक ब्रँड विकते.

ग्राहक त्यांचे लक्ष्य असे होते जे गिफ्ट्सच्या शोधात सतत असतात. नेहमी नाविन्याच्या शोधात जे लोक असतात, त्यांच्यासाठी उत्पादने बनवण्याचे त्यांनी ठरवले. ही संकल्पना, डिझाइन, सप्लायर, प्राइसिंग, रिटेल स्ट्रॅटेजी यावर त्यांनी जवळजवळ एक वर्ष काम केले आणि चुंबकची सुरुवात झाली.40 लाख रुपयात आपले घर विकून व्यवसाय सुरू केला. ही मोठी रिस्क होती. पण त्यांना यश अखेर मिळाले. त्यांचा आता तीन रुम्सचा फ्लॅट आहे. त्यांचे सुरुवातीचे सहा महिने कठीण गेले. कंपनी बुडायला लागली होती.

2010मध्ये बंगळुरू येथे शुभ्रा यांनी आपले पहिले स्टोअर सुरु केले. त्यांनी हे स्टोअर आपले पती विवेक प्रभाकर यांच्या बरोबर उघडले. सन मायक्रोसिस्टममध्ये ते नोकरी करत होते. या व्यवसायात मॅग्नेट्स, की चेन आणि उशीची कव्हर्स सुरुवातीला होती. आता त्यांच्याकडे 100हून अधिक उत्पादने आहेत. आपल्या वस्तू ते वेबसाइट आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून विकतात. त्यांचे देशभरात 17 आउटलेट आहेत. वर्षाला त्यांची कमाई 12 कोटी आहे.

शुभ्रा यांनी सांगितल्याप्रमाणे दोन पर्याय त्यांच्याकडे होते. एक होता दुसऱ्या दुकानांत वस्तू विकायला द्यायच्या आणि नफा घ्यायचा. तर दुसरा पर्याय ब्रँडमध्ये गुंतवणूक करायची आणि आपली दुकाने उघडायची. लाँग टर्म फायद्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. शुभ्रा ब्रँडला आपला लाइफस्टाइल ब्रँड तयार करायचा आहे.

Leave a Comment