आयसीसीची इयॉन मॉर्गन कारवाई


ब्रिस्टल – आयसीसीने इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनला एका एकदिवसीय सामन्यासाठी निलंबित केले आहे. त्याचबरोबर त्याच्या मानधनातील ४० टक्के रक्कम दंड म्हणून कापून घेण्यात आली आहे. मॉर्गनवर निलंबनाची कारवाई आयसीसीचे एलीट पॅनलमधील पंच रिची रिचर्डसन यांनी केली आहे.

निर्धारित वेळेत इंग्लंड संघाने २ षटके कमी टाकली आहेत. संघाच्या इतर खेळाडूंवर सामन्यातील २० टक्के दंड लावण्यात आला आहे. या आधी २२ फेब्रुवारीला बार्बाडोस येथे विंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात षटकांची गती कमी राखण्यात मॉर्गन दोषी आढळला होता. त्याच्यावर गेल्या १२ महिन्यांत दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर एका सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

शुक्रवारी होणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात बंदी घातल्यामुळे त्याला खेळता येणार नाही. तसेच तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयअस्टोने आयसीसीच्या आचार संहिता नियमाचे भंग केल्याने त्याला आयसीसीने फटकारले आहेत. त्याच्या खात्यात एका डिमेरिट गुणांची नोंदही करण्यात आली आहे. बेयअस्टोने सामन्यात बाद झाल्यानंतर त्याची बॅट स्टम्पवर आदळली होती. त्याने त्याची चूक कबूल केली आहे.

Leave a Comment