हार्दिक पांड्यावर वीरेंद्र सेहवागने केला कौतुकाचा वर्षाव


नवी दिल्ली – भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने नुकत्याच संपलेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी दमदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सध्याच्या भारतीय संघात हार्दिक पांड्याची जागा घेणारा एकही खेळाडू नसल्याचे मत सेहवागने व्यक्त केले आहे.

सेहवाग पुढे म्हणाला, कि भारतीय संघातील सध्याच्या घडीला अष्टपैलू खेळाडूंचा विचार केला तर हार्दिकशी तुलना होईल असा एकही प्रतिभावान खेळाडू संघात नाही. जर असे असते तर, विश्वचषकामध्ये हार्दिकची निवड झाली नसती. आयपीएलचे मुंबईला चौथ्यांदा विजेतेपद मिळवून देण्यात पांड्याने महत्वाची भूमिका बजावली असल्याचेही सेहवाग म्हणाला.

कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या एका सामन्यात हार्दिकने 34 चेंडूत ९१ धावांची वादळी खेळी केली होती. पांड्याने यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर साऱ्यांचीच मने जिंकली आहेत. हार्दिकने या हंगामात १६ सामन्यांमध्ये १५ डाव खेळताना ४०२ धावा केल्या आहेत.

Leave a Comment