लाईव्ह स्ट्रिमिंगच्या वापराबाबत फेसबुकने नियम केले कडक


नवी दिल्ली – लाईव्ह स्ट्रिमिंगच्या वापराबाबतचे नियम फेसबुकने कडक केले असून जर युझर्सकडून या नियमांचे उल्लंघन झाल्यास युझर्सची लाईव्ह स्ट्रिमिंगची सेवा तात्पुरती काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

न्यूझीलंडमधील मशिदीजवळ हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याने त्याचे फेसबुक लाईव्ह स्ट्रिमिंग केल्यानंतर फेसबुकवर जगभरातून टीका करण्यात आली होती. फेसबुकच्या कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता तंत्रज्ञानालाही ती घटना ओळखता आली नसल्याची कबुली दिली होती. फेसबुकने असे प्रकार टाळण्यासाठी तीन विद्यापीठामध्ये गुंतवणूक करून व्हिडिओ विश्लेषण तंत्रज्ञानाचा दर्जा सुधारला आहे. फेसबुकच्या लाईव्हची सेवा मर्यादित कशी करता येईल, याचा आढावा घेणार असल्याचे फेसबुकचे उपाध्यक्ष गुय रोसेन यांनी ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे. त्यातून द्वेष पसरविणाऱ्या व्हिडिओवर नियंत्रण आणण्याचा उद्देश्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही लाईव्ह व्हिडिओ करण्यावर कठोर नियम लागू करत आहोत. उदाहरणार्थ दहशतवादी गटाबरोबर कोणी व्हिडिओ लिंक शेअर केल्यास त्या व्यक्तीला काही काळासाठी व्हिडिओ लाईव्ह करणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. फेसबुकचे जगभरात २३८ कोटी वापरकर्ते आहेत.

Leave a Comment