डेक्कन क्वीनचा पुश अँड पुल इंजिनामुळे वाढणार वेग


मुंबई : वेग पुश अँड पुल या इंजिनामुळे मुंबई-पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीनचा वाढणार आहे. 30 ते 35 मिनिटांनी ‘पुश अँड पुल’ या इंजिनामुळे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. डेक्कन क्वीनला काही दिवसांपूर्वी पुश अँड पूल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली. डेक्कन क्वीनला मुंबई ते पुणे 192 किलोमीटरचे अंतर असून हे अंतर कापण्यासाठी तब्बल 3 तास 15 मिनिटाच्या कालावधी लागतो. कर्जत येथे भोर घाट सेक्शन असल्यामुळे बँकर जोडणे आणि काढणे यासाठी अतिरिक्त वेळ लागतो. पण आता पुश-पुल पद्धतीचा वापर डेक्कन क्वीनला करण्याच्या निर्णय घेतल्यामुळे वेळेत एक तासांची बचत होणार आहेत. पूश-पुल पद्धतीमुळे घाट मार्गावर बँकर जोडणे आणि काढणे यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ कमी होणार आहेत.

डेक्कन क्वीन पुणे स्थानकातून सकाळी 7.15 वाजता सुटते. सकाळी 10.25 वाजता मुंबईत पोहचण्याची वेळ आहे. परत जाण्याच्या प्रवासाकरिता मुंबईमधून संध्याकाळी 5.10 वाजता निघून पुण्यात रात्री 8.25 वाजता पोहचते. परंतु आता या डेक्कन क्वीनला पुश अँड पुल या इंजिन जोडल्याने हा सव्वातीन तासांचा प्रवास पावणेतीन तासांवर येणार आहे. डेक्कन क्वीन 1 जून रोजी 90 व्या वर्षात पदार्पण होणार आहे. पुणे स्थानकातून या क्वीनच्या वाढदिवसानिमित्त गाडीला दुहेरी इंजिन जोडावे. अशी मागणी करत डेक्कन क्वीनला जोडण्यात येणाऱ्या दुहेरी इंजिनामुळे प्रवासाला लागणारा वेळ कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

पुश अँड पुल इंजिन गाडीला पुढच्या आणि मागच्या बाजूस जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. यापुर्वी मध्य रेल्वे कडून पुश अँड पुल तंत्रज्ञानानुसार लांबपल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढावा यासाठी राजधानी, निजामुद्दीनसह अनेक गाड्यांना दोन इंजिन जोडण्यात आले होते. डेक्कन क्वीनचा त्याच पार्श्वभूमीवर वेग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडीस दोन्ही बाजूस इंजिन लावल्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त वेग पकडू शकणार आहे.

Leave a Comment