हँडलूम साडीत प्रियांका गांधी बनल्या फॅशन आयकॉन


निडवणूक काळात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बरोबरीने प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या प्रियांका गांधी त्याच्या जोरदार भाषणांनी आणि खास लुक मुळे आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत. त्याचे मुख्य कारण प्रियांका यांचे आजी इंदिरा यांच्याशी असलेले साम्य आणि प्रियांका यांच्या खास हँडलुम आणि कॉटन साड्या. निवडणूक प्रचारात प्रियांका बहुतेक वेळा साडीत दिसत आहेत आणि त्याच्या साड्यांचा चॉइस खास असल्याने त्या फॅशन आयकॉन बनल्या आहेत.


भारतीय राजकारणात महिलांचा सहभाग तुलनेने कमी असला तरी राजकारणातील काही महिला चांगल्याच फायरब्रांड आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, ममता बॅनर्जी उर्फ ममता दीदी, संरक्षण मंत्री निर्मल सीतारमण, बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांचा आवाज राजकारणात बुलंद राहिला आहे. त्यात आता नव्याने भर पडली आहे कॉंग्रेसच्या उत्तरप्रदेश महासचिव प्रियांका गांधी यांची. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललीता अश्याच त्यांच्या खास साड्यांमुळे प्रसिद्ध होत्या. जयललिता यांना हिरवा रंग अधिक पसंत होता. प्रियांका मात्र सर्व रंग आणि त्याची विशेष कॉम्बिनेशन यासाठी फेमस बनल्या आहेत. साडीमध्ये प्रियांका यांना पाहताना आजी इंदिरा यांची आठवण येणे अपरिहार्य बनले आहे.


सोशल मिडीयावर विविध साड्यामधली प्रियांका यांची छबी चांगलीच चर्चेत आहे आणि फॅशन जगतात यांच्या साड्या व्हायरल होत आहेत. हँडलुम साड्या महाग असतात कारण त्या हाताने विणल्या जातात आणि काही साड्या तयार करायला महिनोन्महिने लागू शकतात. प्रियांका हँडलुम शिवाय कांचीपुरम, नालगोंडा, बनारसी, संबलपुरी साडीतही दिसत आहेत. त्यांच्या हँडलुम पसंतीमुळे त्यांना ब्रांड अँबेसीडर ऑफ इंडियन हँडलुम म्हटले जात आहे. त्यांच्या मातोश्री सोनिया यांचीही पहिली पसंती साडी असून त्याही हँडलूमलाच प्राधान्य देतात.

Leave a Comment