रिअलमी एक्सची खास एडिशन, ओनियन आणि गार्लिक स्मार्टफोन


चीनी स्मार्टफोन कंपनी रिअलमी ने रिअलमी एक्स आणि एक्स लाईट हे दोन नवे फोन लाँच केल्यानंतर लगेचच रिअलमी एक्सच्या दोन खास एडिशन ओनियन आणि गार्लिक लाँच केल्या आहेत. जपानी औद्योगिक डिझायनर नाओता फुकासावा यांच्याशी त्यासाठी करार करण्यात आला असून हे युनिक एडिशन फोन कांदा आणि लसून टेक्स्चरशी मिळतेजुळते आहेत.

फुकासावा यांना कांदा आणि लसूण यांच्या वेगळ्या टेक्चरचे खूपच आकर्षण आहे व त्यामुळे याच टेक्श्चरमधील फोन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असे समजते. गार्लिक एडिशन पांढऱ्या रंगात तर ओनियन एडिशन ऑरेंज रंगात आहेत. या दोन्ही फोनच्या मागच्या बाजूला छोट्या रेषा आहेत. या दोन्ही फोनची विक्री २० मे पासून सुरु होणार असून त्यांची किंमत १९५०० रुपये आहे.

रिअलमी एक्स मध्ये ६.५ इंची फुल एचडी बेजललेस एमोलेड डिस्प्ले दिला गेला असून कंपनीचा पहिला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे. मोटोराइज्ड पॉप अप सेल्फी कॅमेरा, अँड्राईड ९.० पाय ओएस, ३७०० एमएएच ची क्विक चार्ज सपोर्ट करणारी बॅटरी, ४८ एमपी आणि ५ एमपीचा ड्युअल रिअर कॅमेरे आणि सेल्फी साठी १६ एमपीचा पॉप अप कॅमेरा आहे. ४ रॅम ६४ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज अशी व्हर्जन असून त्यांच्या किमती अनुक्रमे १५ हजार, १६ हजार आणि १८ हजार रुपये आहेत.

Leave a Comment