या शेरपाने केला एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा विक्रम


गिर्यारोहक मग तो जगातल्या कुठल्याही देशाचा असो त्याची पहिली इच्छा एव्हरेस्ट पादाक्रांत करणे ही असते. लाखो गिर्यारोहक या इच्छेने एव्हरेस्टवर चढाईसाठी येतात पण त्यातील हाताच्या बोटावर मोजावे इतक्यानाही हे यश मिळत नाही. मात्र नेपाळ मधील एका व्यक्तीने याबाबत स्वतःचेच रेकॉर्ड तोडले असून जगातील सर्वाधिक उंचीच्या या शिखरावर २३ व्या वेळी यशस्वी चढाई केली आहे. त्याचे नाव आहे, कमी रिता शेरपा. ४९ वर्षाच्या या शेर्पाने एव्हरेस्ट पादाक्रांत करून जागतिक रेकॉर्ड नोंदविले आहे. त्याने सर्वप्रथम १३ मे १९९४ मध्ये एव्हरेस्ट सर केले होते.


शेरपा समुदायाच्या मदतीशिवाय कोणताच गिर्यारोहक एव्हरेस्टवर पाउल टाकण्याचा विचार करू शकत नाही असे म्हणतात. हे शेरपा गिर्यारोहकांची अवजारे, त्यांचे समान, राहण्याचे तंबू, खाण्याचे सामान असा सारा भार वाहून नेतातच पण चढाईच्या प्रत्येक पावलावर त्याच्या बरोबर असतात. कामी यांनी आत्तापर्यंत गिर्यारोहकांच्या ४१ टीम बरोबर काम केले आहे आणि ३७८ गिर्यारोहकांना साथ केली आहे. हिमालयन टाईम्स रिपोर्टनुसार गतवर्षी कामी यांनी २२ व्या वेळी एव्हरेस्टवर चढाई करून रेकॉर्ड केले होते आणि बुधवारी सकाळी ७ वा.५० मिनिटांनी त्यांनी २३ व्या वेळी एव्हरेस्टवर पाउल रोवून त्यांचेच रेकॉर्ड मोडले आहे.

२०१७ मध्ये कामी २१ वेळा एव्हरेस्ट चढणारी तिसरी व्यक्ती ठरले होते. त्यांच्या अगोदर अपा शेरपा आणि फुर्बा शेरपा यांनी ही कामगिरी केली होती पण ते दोघेही आता निवृत्त झाले आहेत. त्यामुळे २०१८ वेळा कामी यांनी २२ व्या वेळी एव्हरेस्ट सर करून विक्रम केला होता.

Leave a Comment