तणावमुक्तीसाठी चक्क संगीताचे धडे घेत आहे शिखर धवन


नवी दिल्ली – जगभरातील क्रिकेटप्रेमी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान सर्व संघ आपल्या तयारीत व्यस्त आहेत. भारतीय संघाचा स्टायलीश खेळाडू शिखर धवन विश्वचषक स्पर्धेपूर्वी तणावापासून दूर राहण्यासठी शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तो यात बासरी वाजवताना दिसत आहे.

सध्या गब्बर नावाने प्रसिद्ध असलेल्या शिखर धवननचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. शिखर म्हणाला, सूफी संगीत मला खुप आवडते. त्याचबरोबर मला वडाली ब्रदर्स खूप आवडतात. बासरी कशी वाजवायची ते सध्या मी शिकत आहे. आपण संगीत तणावापासून दूर राहण्यासाठी शिकत असल्याचे त्याने सांगितले. शिखरच्या मते, जीवनातील आपला काही वेळ आपल्या छंदासाठी दिला पाहिजे.

यंदाच्या आयपीएलमध्ये शिखर धवनने शानदार फलंदाजी केली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना त्याने १६ सामन्यात ५२१ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडमध्ये विजयी पताका फडकविण्यासाठी शिखरला सलामीला खेळताना दमदार सुरुवात करून द्यावी लागेल. त्याच्याकडून विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला खूप अपेक्षा आहेत.

Leave a Comment