भारतात लाँच झाला वनप्लस7 आणि वनप्लस7 Pro


भारतासह अमेरिका आणि युरोपात एकाच वेळी आणि एकाच दिवशी म्हणजे 14 मे रोजी रात्री 8.15 वाजता टेक जगतात अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे वनप्लस7 आणि वनप्लस7 Pro हे स्मार्टफोन एका इव्हेंटमध्ये अखेर लाँच करण्यात आले आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने हे दोन्ही उच्च श्रेणीतील स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. वनप्लसच्या स्मार्टफोन्समध्ये यावेळी पहिल्यांदाच डॉल्बी सपोर्टेड स्पीकर्स देण्यात आले आहेत. गुगल लेन्सचा सपोर्ट या फोनच्या कॅमेरामध्ये आहे. त्याच्या आधारे कोणत्याही गोष्टीचा, वस्तूचा फोटो काढल्यानंतर त्याच्याविषयी माहिती मिळवता येणार आहे.

कंपनीने वनप्लस 7 Pro हा स्मार्टफोन 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज , 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज आणि 12GB RAM आणि 256GB स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर 48 हजार 999 रुपये, 52 हजार 999 रुपये आणि 57 हजार 999 रुपये अनुक्रमे या तिन्ही व्हेरिअंट्सची किंमत आहे. अँड्रॉइड पाय 9.0 या आवृत्तीपासून वनप्लस 7 प्रो हा स्मार्टफोन विकसित करण्यात आलेल्या ऑक्सीजन ओएस 9.5 या आवृत्तीवर कार्यरत असणार आहे. ट्रिपल रिअर कॅमेऱ्याचा सेटअप या कॅमेऱ्याला आहे. त्यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असून त्याला 8 व 16 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यांची जोड आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 16 मेगापिक्सल वाइड अँगलने युक्त असणारा कॅमेरा आहे. 6.7 आकारमानाचा, क्युएचडी(3220 बाय 1440 पिक्सल) क्षमतेचा 19: 5:9 अॅस्पेक्ट रेशो असणारा व फ्युईड अमोलेड प्रकारातील डिस्प्ले फोनमध्ये आहे. हा वनप्लसच्या आतापर्यंतच्या फोन्समधील सर्वात चांगल्या दर्जाचा डिस्प्ले असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फोनसाठी क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. 4 हजार मिलिअँपिअर क्षमतेची या मोबाईलची बॅटरी असून केवळ 20 मिनिटात 48 टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. तसेच हा फोन गरम होऊ नये यासाठी यामध्ये लिक्विड कुलिंग ही सिस्टिम वापरण्यात आली आहे.

वनप्लस 7 मध्ये वनप्लस 7 Pro बहुतांश फीचर्स आहेत पण यातील काही फीचर्स तुलनेने कमी दर्जाचे आहेत. डिस्प्लेचा आकार कमी अर्थात 6.41 इंच आहे. 6GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेज व 8GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा फोन उपलब्ध असेल. अनुक्रमे 32 हजार 999 आणि 37 हजार 999 एवढी या दोन्ही व्हेरिअंट्सची किंमत आहे. फोनमध्ये मागील बाजूला ट्रिपलऐवजी ड्युअल कॅमेऱ्याचा सेटअप (48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल)असून सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर 3 हजार 700 मिलिअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment