स्वित्झर्लंड मध्ये बनले महाआरामदायी चित्रपटगृह


स्वित्झर्लंड हा देश मुळातच पर्यटकांचा स्वर्ग मनाला जातो. त्यात आता मनोरंजांची खास सोय या देशात केली गेली आहे आणि महालग्झरी किंवा महाआरामदायी चित्रपटगृहात ही करमणूक मिळणे म्हणजे दुधात साखरचकी. मोठ्या पडद्यावर हजारोंच्या उपस्थितीत चित्रपट पाहणे आता इतिहासजमा झाले असून मल्टीप्लेक्स चित्रपटगृहामुळे शेकडो चित्रपटशौकिनांच्या सहवासात चित्रपट पाहण्याचा अनुभव आपण घेत आहोत. स्वित्झर्लंडमध्ये या पुढचे पाउल टाकले गेले आहे. आता अगदी निवडक लोकांच्यात बसूनही घराच्याघरी बेडवर लोळून चित्रपट पाहण्याची संधी नव्या चित्रपटगृहाने उपलब्ध करून दिली आहे.


या व्हीआयपी सिनेमागृहात एकावेळी फक्त २२ प्रेक्षक चित्रपट पाहू शकणार आहेत. त्यांच्यासाठी बेडरूम सारख्या सुविधा आहेत. म्हणजे या चित्रपटगृहात चक्क ११ डबलबेड घातले गेले आहेत. हेडरेस्ट सह असलेल्या या बेडवर आरामात लोळून चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे. बेडवर उश्या गाड्या आहेत तसेच साईड टेबल आहेत. त्यासाठी ४८.५ डॉलर्स म्हणजे ३४०० रुपयांचे तिकीट काढावे लागेल पण त्यात मोफत स्नॅक्स, ड्रिंक्स दिली जाणार आहेत. त्यामुळे मध्यंतरात पॉपकोर्न, कोल्डड्रिंक साठी लाईन लावण्यापासून सुटका मिळणार आहे. येथे स्लीपर सुद्धा दिल्या जाणार आहेत त्यामुळे पायातील बूट काढून सिनेमा पाहता येईल.

स्विस जर्मन सीमेवर स्पायटेनबच मध्ये pathe नावाचा हा सिनेमा हॉल असून दुसऱ्या सिनेमा हॉलमध्ये सोफ्यावर बसून सिनेमा पाहण्याची सुविधा दिली गेली आहे तसेच खास बच्चे लोकांसाठी बिन बॅग्ज सिनेमा हॉल आहे. त्याचे तिकीट १४ डॉलर्स म्हणजे ९८० रुपये आहे. प्रत्येक शो नंतर येथील बेडवरील चादरी उश्या बदलल्या जातात असे चित्रपटगृहाचे मालक सांगतात. ९ मे २०१९ पासून हा सिनेमा हॉल सुरु झाला आहे.

Leave a Comment