ताशी ११९ किमीवेगाने ऑटो रिक्षा पळवून केला विश्वविक्रम


रिक्षा पळून पळून किती वेगाने पळेल अशी शंका आता कुणीही घेऊ नये. कारण ब्रिटन मधील सामान वाहतूक व्यावसायिक मॅट एव्हरडे याने त्याच्या चुलतभावाच्या साथीत ताशी चक्क ११९ किलोमिटर वेगाने रिक्षा पळवून गिनीज बुक मध्ये त्याच्या नावाची नोंद केली आहे. ही रिक्षा म्हणजे टुकटुक सर्वाधिक वेगाने पळविण्यासाठी ताशी ११० किमी वेगाचे लक्ष्य ठेवले गेले होते पण प्रत्यक्षात ती ११९ किमी वेगाने दौडली.


मॅट आणि त्याचा चुलतभाऊ रसेल शेर्मन त्यांनी नॉर्थ यॉर्कशायर भागातील एल्विंग्टन एअरफिल्ड वर ही टुकटुक चालविली. मॅट म्हणतो इतक्या वेगाने रिक्षा चालविताना मला चंद्रावर फिरल्याचा भास होत होता. ही रिक्षा त्याने ईबे वरून खरेदी केली होती. त्याचे असे झाले होते कि मॅट त्याच्या मित्राच्या लग्नासाठी थायलंडला गेला होता आणि त्याने तेथे रिक्षातून प्रवास केला आणि हे वाहन त्याला एकदम आवडले. त्याने रिक्षा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि ती खरेदी केलीही. त्यावर १३ लाख रुपये खर्च करून त्याने ती अधिक आधुनिक बनविली आणि त्याला १३०० सीसीचे इंजिन बसवून घेतले. त्यातून ही रिक्षा विक्रमी वेगाने चालविण्याची कल्पना त्याला सुचली आणि त्याने ती प्रत्यक्षात उतरविली देखील.

Leave a Comment