लहान वयात मोठे यश मिळविलेल्या मार्क झुकेरबर्ग विषयी काही खास


जगाचा कानाकोपरा व्यापून सर्व जगाला जोडणारे फेसबुक तयार करणारा मार्क झुकेरबर्ग १४ मे रोजी पस्तिशीचा झाला. फेसबुक या सोशल साईटची निर्मिती करून लहान वयात प्रचंड यश मिळविलेल्या मार्कविषयी बरेच काही लोकांना माहिती आहे मात्र तरीही त्याच्या अश्या काही खास गोष्टी अजूनही लोकांसमोर आलेल्या नाहीत. कोणत्या आहेत या गोष्टी?


फेसबुक म्हटले कि निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर उमटलेली पांढरी अक्षरे चटकन नजरेसमोर येतात. पण या निळ्या रंगाचे रहस्य अनेकांना माहिती नाही. या रंगाचा थेट संबंध मार्कच्या एका आजाराशी आहे. मार्क कलर ब्लाईंड म्हणजे रंगांधळा आहे. त्याला लाल आणि हिरवा रंग ओळखू येत नाही पण निळा रंग दिसतो. यामुळे फेसबुकचा लोगो निळा आहे. मार्क बालपणापासून उद्योगी आहे. वयाच्या १२ व्या वर्षी त्याने पहिले प्रोग्रामिंग केले होते. मार्कचे वडील डॉक्टर आहेत त्यांच्या मदतीसाठी मार्कने एक इंस्टंट मेसेजिंग प्रोग्राम डिझाईन केला होता. त्यामुळे ते पेशंट कधी पोहोचणार ते जाणून घेऊ शकत असत.

त्यानंतर त्याने कुणालाही त्यांच्या आवडीची गाणी एकत्र करून ऐकता यावीत यासाठी आजचा एमपी ३ प्लेयर बनविला होता पण त्याचे नाव सीनॅस मिडिया प्लेअर असे ठेवले होते. तेव्हा मार्क हायस्कूल मध्ये शिकत होता. मात्र आजही त्याच्याकडे कोणतीही अधिकृत पदवी नाही. त्याला मायक्रोसॉफ्ट मध्ये नोकरीची ऑफर आली होती पण त्याला नोकरी करण्यात रस नव्हता त्यामुळे त्याने त्याचा मित्र अॅम्लो याच्यासोबत एक वेबसाईट बनविली तिला कोरा असे नाव दिले गेले होते.


मार्क पुस्तकांचा शौकीन आहे आणि सी प्लस प्लस प्रोग्राम त्याने पुस्तके वाचूनच आत्मसात केला होता. त्याला विविध भाषा त्यातही प्राचीन भाषा शिकण्याची आवड आहे. तो लॅटीन आणि चीनी भाषा मँडरीन शिकला आहे. फिटनेस बाबत तो अति जागरूक असतो आणि दरवर्षी स्वतःसाठी काही गोल ठरवून घेतो.२०१६ मध्ये त्याने ३६५ मैल धावायचे लक्ष्य ठेवले होते आणि काही महिन्यात ते गाठले होते. मार्कची उंची ५ फुट ७ इंच आहे पण फोटोमध्ये तो अधिक उंच वाटतो यामागे तो विशिष्ठ स्टाईलने फोटो काढतो हे कारण आहे. त्याचे त्याच्या कुत्र्यावर खूप प्रेम असून या कुत्र्याचे त्याने वेगळे फेसबुक पेज बनविले आहे आणि त्याला २० लाख लाईक मिळाले आहेत.

Leave a Comment