फेसबुकला टक्कर देणार टीकटॉक


बंगळुरु – सध्याच्या घडीला आपल्या देशात फेसबुक आणि टिकटॉकमध्ये जोरदार स्पर्धा सुरु असून दोन्ही कंपन्यांमध्ये नवीन युजर्संना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काटे की टक्कर लागली आहे. दोन्ही कंपन्या जास्तीत जास्त युवकांना आकर्षिक करण्यासाठी सज्ज आहे. भारतीय इंटरनेट बाजारवर अग्रस्थानी असलेल्या फेसबुकला चीनमधील टिकटॉक कंपनी आव्हान देत असल्यामुळे अमेरिकेतील फेसबुक ही सोशल मिडीया कंपनीला इंटरनेट बाजारात आपला दबदबा कायम राखण्याचे आव्हान आहे.

मार्केट तज्ज्ञ फर्म सेंसर यांच्यानुसार 2019 मध्ये पहिल्या तीन महिन्यात जवळपास 18.8 कोटी युजर्सने टिकटॉक डाऊनलोड केला आहे. यामध्ये 47 टक्के वाटा हा भारतीय युजर्सचा आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत फेसबुक डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या 17.6 कोटी एवढी आहे. फेसबुकला या तीन महिन्यात 21 टक्के नवीन युजर्स भारतातून मिळाले. याआधी फेसबुक 2018 च्या शेवटी सर्वात जास्त डाऊनलोड केले जाणारे अ‍ॅप होते. पण फेसबुकची डोकेदुखी या नवीन आकडेवारीमुळे वाढणार आहे. तरीही फेसबुकचा वापर डेस्कटॉपवर करता येणे ही कंपनीसाठी दिलासादायक बाब आहे.

इकोनॉमिक्स टाइम्सला टिकटॉकने दिलेल्या माहितीनुसार टिकटॉक या सोशल मिडीया अ‍ॅपचा वापर भारतात येणाऱ्या काळात 20 ते 40 कोटी युजर्स करतील. आपल्या जीवनातील आनंद मित्रमैत्रिणींसोबत सामुहिकरित्या साजरा करु शकतील. भारताचे मार्केट त्यामुळे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. स्टैटिस्टाच्या म्हणण्यानुसार फेसबुकचे भारतात आत्ता 30 कोटी युजर्स आहेत. तर 20 कोटी युजर्स टिकटॉकचा वापर करतात. टिकटॉकच्या 20 कोटी युजर्संपैकी 12 कोटी युजर्सं सरासरी महिनाभर वापर करतात. तर 2020 पर्यंत भारतात 67 टक्के इंटरनेट युजर्संचे वय 35 वर्षापेक्षा कमी असणार आहे.