तामिळनाडूचे मंत्री महोदय म्हणतात, कमल हसनची जीभ कापावी


चेन्नई – तामिळनाडूचे मंत्री के. टी. राजेंद्र बालाजी यांनी अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी हिंदू दहशतवादाविषयी भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या कमल हसन यांची जीभ कापावी, असे वक्तव्य केले आहे. संपूर्ण समाजाला एका व्यक्तीसाठी दोष दिला जाऊ शकत नाही. कमल यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने कारवाई करावी. तसेच, राजेंद्र बालाजी यांनी त्यांच्या पक्षावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. तो म्हणजे महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे,’ असे वादग्रस्त वक्तव्य कमल हसन यांनी केले होते. मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे कमल हे प्रमुख आहेत. तामिळनाडूतील अरीवाकुरीची लोकसभा मतदार संघातील प्रचार रॅली दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.

हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू दहशतवादाच्या मुद्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना, कमल हसन यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान, कमल यांनी हे विधान मुस्लीम लोकसंख्या जास्त असलेल्या मतदार संघात करत असलो तरी, मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी ते करत नसल्याचे म्हटले होते.

Leave a Comment