जगातील या देशात असतो सर्वाधिक आणि कमी तासांचा रोजा


मुंबई – रमजानचा महिना इस्लाम धर्मात सर्वात पवित्र महिना मानला जातो. यादरम्यान मुस्लिम बांधव संयम बाळगून उपाशी राहण्याचा व खुदाची इबादत करतात. उन्हाळ्यात या वेळी रमजान आल्याने दिवस मोठा असतो. त्यामुळे संयम आणि परीक्षेचा काळ अजून वाढला आहे. जगातील विविध देशांत दिवस मावळण्याचा व सकाळ होण्याच्या दृष्टीने सेहरी व इफ्तारची वेळ पाहता या वेळी आइसलँडवर २१ तास २९ मिनिटांचा सर्वात मोठा रोजा आहे. येथे शेवटचा रमजान सकाळी २ वाजून ८ मिनिटे व इफ्तार रात्री ११ वाजून ३८ मिनिटांचा असेल. पहिल्या रमजानला सकाळी दोन वाजून ४४ मिनिटास सेहरी व रात्री १० वाजून ८ मिनिटाला इफ्तार झाला.

दिवसाऐवजी आइसलँडमध्ये रात्र लहान असते. दिवस १८ तासांचा व रात्र ६ तासांची असते. रात्री दहा वाजता इफ्तारसोबत एक रोजा पूर्ण होतो, तर पुढील चार तासांनी दुसऱ्या रमजानची सेहरी सुरू होते. त्याचबरोबर असे अनेक देश आहेत, जेथे १५ ते २० तासांचा एक रोजा असतो. यात स्पेन, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड, डेन्मार्क, रशिया व नॉर्वेमध्ये १७ ते २० तासांचा एक रोजा असतो. याशिवाय सिंगापूर, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, जिनेव्हा, ऑस्ट्रेलिया, चिली व ब्राझीलमध्ये फक्त ११ ते १४ तासांचा रमजान असतो.

याठिकाणी होतात सर्वात मोठे रोजे
आइसलँड 2:44 वा 10:08 वा. 21 तास 29 मिनिटे
नेदरलँड 3:07 वा. 9:45 वा. 18 तास 39 मि.
नार्वे 3:52 वा 8:39 वा. 17 तास 47 मिनिटे
डेन्मार्क 2:37 वा. 9:58 वा. 19 तास 21 मि.

या ठिकाणी होतात सर्वात लहान रोजे
न्यूझिलंड 5:53 वा. 5:13 वा. 11तास 20 मि.
ऑस्ट्रेलिया 5:23 वा. 4:55 वा. 11 तास 30 मिनिटे
सिंगापूर 5:41 वा. 7:10 वा. 13तास 20 मि.
इंडोनेशिया 4:42 वा. 5:45 वा. 13 तास 3 मिनिटे
अर्जेंटिना 4:39 वा. 6:11 वा. 14तास 22 मि.

Leave a Comment