या रुग्णसेवकाने 5 वर्षात घेतले 300 रुग्णांचे जीव


गेल्या 5 वर्षात 300 लोकांचे डेलमेनहोर्स्ट रुग्णालयातील एका नर्सने (रुग्णसेवक) जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपीचे नाव नील्स होगेल असे आहे. हे ह्या रुग्णातील प्रशासनाला तेव्हा लक्षात आले, जेव्हा त्यांच्या देखरेखीत असलेल्या रुग्णांचा मृत्यू होऊ लागला. रुग्णांना औषधांचा ओव्हरडोस देऊन तोच मारायचा, अशी शंका रुग्णालय प्रशासनाला होती.

डेलमेनहोर्स्ट हॉस्पीटलमध्ये जर्मनीत राहणारा 42 वर्षीय नर्स होगेल एका नर्सच्या ओळखीवर नोकरीला लागला होता. पण ह्या नर्सचे कालांतराना रुपांतर सिरियल किलरमध्ये झाले. त्याने त्याच्या देखरेखेखाली असलेल्या रुग्णांना ओव्हरडोस देऊन आतापर्यंत 300 रुग्णांना मारले असल्याचे रुग्णालय प्रशानसनाकडून सांगण्यात येत आहे. ही गोष्ट उघडकीस आणण्यासाठी प्रशासनाला अनेक वर्षांचा कालावधी लागला.

जर्मनी, पोलंड आणि तुर्कीवरुन 130 मृतदेह अधिका-यांना सापडले आहे. पण ह्या हत्यांमागचे नेमके कारण काय हयाचा अजून शोध सुरु आहे. नील्सने आपण 43 लोकांना मारले असल्याचा कबुली जबाब सुद्धा दिला आहे. तसेच त्याने इतर 52 लोकांना मारल्याचेही नाकारले आहे. 2000 सालापासून येथे होगेल काम करत होता. मात्र अनेकदा त्यांची विक्षिप्त हालचाल देखील सर्वांना दिसायची. 2 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी होगेलला जन्मठेपेची शिक्षा दिली गेली आहे. त्याच्यावर अन्य 4 रुग्णांच्या हत्येचा तपास चालू आहे.

Leave a Comment