देशभरातील २२ शैक्षणिक संस्थांवर सीबीआयचे छापे


नवी दिल्ली – सीबीआयकडून पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि चंदीगड या राज्यांमधील विविध २२ शैक्षणिक संस्थांवर छापे टाकण्यात आले. शिष्यवृत्तीशी संबंधित कोट्यवधींचा घोटाळा येथे झाला असल्याचा संशय आहे.

अज्ञात अधिकाऱ्यांच्या विरुद्ध शिष्यवृत्तीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केल्यानंतर छापे टाकण्यात आले. एसी, एसटी, ओबीसी आणि मागासवर्गीय शिष्यवृत्तींचा यामध्ये समावेश आहे. जवळपास २५० कोटींचा घोटाळा यामध्ये झाल्याची माहिती सीबीआय प्रवक्त्याने दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणारा शिष्यवृत्तीचा निधी दुसऱ्याच व्यक्तींच्या खात्यात जमा करण्यात आला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment