इंडियन आर्मीचा युनिफॉर्म होणार अधिक स्मार्ट


जगातील दुसरे मोठे सैन्यदल असलेले इंडिअन आर्मी त्यांचा युनिफॉर्म बदलण्याच्या विचारात असून त्यासाठी प्रत्यक्ष फिल्ड मध्ये तैनात असलेले आर्मी कमांड, आर्मी ऑफिसर यांच्याकडून मार्गदर्शक सूचना मागविल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर या संदर्भात वरिष्ठ सेनाधिकारी चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या संदर्भात अन्य देशांच्या गणवेशांचा अभ्यास केला जात आहे. बदलते युद्ध तंत्र नवीन युनिफॉर्म ठरविताना लक्षात घेतले जाणार आहे आणि नवे गणवेश अधिक स्मार्ट आणि आरामदायी असतील याचीही काळजी घेतली जाणार आहे असे लष्कर मुख्यालायातील अधिकारी म्हणाले.

लष्कराचा गणवेश बदलण्याची हे पहिलीच वेळ नाही तर गणवेशात होणारा हा चौथा बदल आहे. यापूर्वी स्वातंत्र्यानंतर पहिला बदल खाकी रंगावरून ऑलिव्ह ग्रीन केला गेला होता. कारण पाकिस्तान आणि भारत यांच्या लष्करी गणवेशाचा रंग वेगळा असावा असा त्यामागे विचार होता. पाकिस्तान लष्कर आजही खाकी रंगाचा गणवेश वापरते. सध्याचे युनिफॉर्म पॉलीएस्टर च्या कापडापासून बनविले जातात मात्र भारतातील उष्ण हवामान आणि हवेतील आर्द्रता यामुळे सैनिकांना ते आरामदायी नाहीत याचाही विचार केला जात आहे.


सध्याच्या गणवेशात रँक खांद्यावरच्या पट्टीवरून ओळखता येतात. युएस आणि युकेच्या लष्करी गणवेशात रँक छातीवर लावतात त्याचाही विचार होत आहे. सध्याच्या कॉम्बॅट युनिफॉर्ममध्ये चामड्याचा रुंद पट्टा वापरात आहे तो बहुदा हटविला जाईल असेही सांगितले जात आहे. लष्कराच्या बुटामध्येही काही बदल अपेक्षित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार इंडिअन आर्मी सध्या ९ प्रकारचे गणवेश वापरत असून ते चार कॅटेगरी मध्ये विभागले गेले आहेत. कॉम्बॅट युनिफॉर्म, दोन सेरेमोनीयल, तिसरा पीस टाईम आणि चौथा मेस युनिफॉर्म अशी ही विभागणी आहे. सर्व टाईपमध्ये उन्हाळ्यासाठी आणि थंडीसाठी वेगळे युनिफॉर्म असून सेरेमोनियल मध्ये तीन प्रकार आहेत. प्रत्येक युनिफॉर्मसाठी वेगळा नंबर आहे.

Leave a Comment