माणसांच्या रूग्णालयात सिंहावर कॅन्सर तज्ज्ञांच्या टीमने केले उपचार


कॅन्सरचा उपचार दक्षिण आफ्रिकेतील एका सिंहावर करण्यात आले असून मनुष्यांना देतात तशीच रेडीएशन थेरपी या सिंहाला दिली गेली आणि एका खाजगी रूग्णालयात हे सगळे करण्यात आले. सिंहाला ऑपरेशन थिएटरमध्ये सामान्य रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक घाबरू नये म्हणूण मागच्या दाराने आणण्यात आले. पाच मिनिटे ही थेरपी डॉक्टरांच्या टीमने केली. २६० किलो ग्रॅम या १६ वर्षाच्या सिंहाचे वजन आहे.

जेव्हा त्याला उत्तर-पूर्व दक्षिण आफ्रिकेच्या प्रेटोरिया येथील मुएलमेड मेडिक्लिनीकमध्ये आणले गेले, तेव्हा त्याच्या तोंडावर पट्टी बांधण्यात आली होती. जनावरांसाठी एकही रेडिएन क्लीनिक दक्षिण आफ्रिकेत नसल्यामुळे बेशुद्ध करून त्याला खाजगी रूग्णालयात आणले गेले. डॉक्टरांनी सांगितले की, सहा तज्ज्ञांच्या टीमने सिंहावर उपचार केले. पाच रेडिओथेरपिस्ट आणि एक ऑन्कोलॉजिस्टचा यात समावेश होता. सिंहाच्या नाकावरील जखमांवर उपचार करण्यात आल्यानंतर त्याच्या डोळ्यांवर आणि नाकाच्या भागाला बॅंडेज बांधण्यात आले. जेणेकरून पाच मिनिटे चालणाऱ्या उपचारावेळी सुरक्षा असावी. या सिंहाचा केअरटेकर असलेल्या हायनिसने सांगितले की, रेडिओथेरपीचे पाच सेशन होतील. तशी ही थेरपी फार महागडी आहे. पण याचा फायदा नक्की होईल.

प्रेटोरियापासून १८ किमी दूर लॉरी पार्क अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड ओल सॅन्चुरीमध्ये हा सिंह राहतो. त्याच्या जखमा काही दिवसांपूर्वीच बघण्यात आल्यानंतर बायोप्सी केली गेली. त्याला त्यातून कॅन्सर असल्याचे समोर आले होते. हायनिसने सांगितले की, आमच्या अपत्यासारखा हा सिंह आहे. आम्ही त्याला वाचवण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करणार आहोत. सामान्यपणे एका वाघाचं जंगलातील सरासरी आयुष्य हे १४ वर्ष तर पिंजऱ्यात साधारण २२ वर्षाचे असते.

Leave a Comment