ब्लडप्रेशर तपासण्यात जवळपास 40 % डॉक्टर चुकतात : सर्व्हे


लखनौ : देव न करो पण आपल्यापैकी बहुतेक जणांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो. अनेकजण ब्लड प्रेशर तपासण्यासाठी डॉक्टरकडे जातात. ब्लड प्रेशर तपासण्याचे मशीन हल्ली छोट्या-मोठ्या दवाखान्यातही उपलब्ध असते. अनेकजण या मशीनद्वारे डॉक्टरांकडून ब्लड प्रेशर किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण व्यवस्थित ब्लडप्रेशर तपासले आहे की नाही याबाबत अनेकांना खात्री देता येत नाही. नुकतेच उत्तरप्रदेशातील किंग जॉर्ज मेडीकल युनिव्हर्सिटीने (KGMU) केलेल्या सर्वेक्षणानंतर, रुग्णांचे ब्लडप्रेशर जवळपास 42 टक्के एमडी डॉक्टरांना व्यवस्थित तपासता येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर ब्लडप्रेशर कसे चेक करतात हेही 38 टक्के एमबीबीएस डॉक्टरांना माहित नसल्याचे उघड झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात केजीएमयूच्या या सर्वेक्षणानंतर खळबळ उडाली आहे.

अनेकांना धावपळीच्या युगात बदलते हवामान, बदलती जीवनशैली, फास्टफूडचे अतिसेवन, दारु, सिगारेट या सर्व गोष्टींमुळे ब्लडप्रेशरचा त्रासाला सामोर जावे लागते. ब्लडप्रेशरबाबत एका कार्यक्रमाचे रविवारी केजीएमयूतील फीजियलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर नरसिंह वर्मा यांनी आयोजन केले होते. देश-विदेशातील अनेक डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी ब्लड प्रेशर कसे तपासले जाते याचे प्रात्यक्षिक करण्यास या सर्व डॉक्टर आणि नर्सला सांगितले. त्यात 42 टक्के एमडी डॉक्टर आणि 38 टक्के एमबीबीएस डॉक्टरांना ब्लड प्रेशर व्यवस्थित तपासता येत नसल्याचे सिद्ध झाले. विशेष म्हणजे ब्लड प्रेशर केवळ 32 टक्के नर्सेसला तपासता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर ब्लड प्रेशर व्यवस्थित तपासण्याबाबत डॉक्टरांना काही टिप्सही डॉ. नरसिंह यांनी दिल्या. कोणत्याही डॉक्टरांनी रुग्णाचे ब्लड प्रेशर चेक करताना हातावर कोणतेही कापड ठेऊ नका. तसेच रुग्णाला पाय क्रॉस करुन किंवा खुर्चीवर टेकून बसण्यास सांगू नका. कारण खुर्चीवर टेकल्याने ब्लड प्रेशरमध्ये 5-10 अंकाचा फरक जाणवू शकतो. या फरकामुळे रुग्णाच्या उपचारात फरक पडू शकतो.

तसेच ब्लड प्रेशरचा अनेकदा जास्त तापट किंवा तणाव घेणाऱ्या व्यक्तींना त्रास असतो असा आपल्याकडे समज आहे. मात्र शांत दिसणाऱ्या व्यक्तींनाही ब्लड प्रेशरचा त्रास असतो. एक वस्तू असताना दोन वस्तू दिसणे, अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, अतिघाम येणे, धाप लागणे, पायाला सूज येणे यासारखी लक्षणे जर एखाद्या व्यक्तीला आढळली तर त्याने तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. असेही केजीएमयूतील फीजियलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर नरसिंह स्पष्ट केले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment