100 दिवसांत मुस्लिम पिता-पुत्राने मोफत बांधून दिले मंदिर


एका मुस्लिम कारागीर पिता-पुत्राने 100 दिवसांत मंदिर उभारण्याचे काम मध्य प्रदेशमधील इटारसी येथील केसला गावात पुर्ण केले आणि त्यांनी या बदल्यात एक रूपयाचाही मोबदला घेतला नाही. मंदिर बनवणाऱ्या शिक्षिकेने त्यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल एक एकर जमीन देण्याची घोषणा केली आहे. गावातच एक्सीलंस स्कुलमध्ये शिक्षिका सावित्री उडके केसला 15 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांना मातृदिनानिमित्त मंदिर बांधून आपल्या आईची इच्छा पुर्ण करायची होती. सावित्रीने त्यामुळे आपल्या संपत्तीतून 5 लाख रूपये मंदिरासाठी दान दिले होते, आता ज्याचे बांधकाम पुर्ण झाले आहे. पण रेहमान आणि रिजवान या पिता-पुत्राने हे काम करताना एक पैसाही त्यांच्याकडून घेतला नाही. रहमान यांनी सांगितले की, ते आपल्या मुलाला मंदिराचे बांधकाम सुरू असताना दुसरीकडे कामासाठी पाठवत असत, त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. मंदिरात शनिवारी प्रतिमेची स्थापना करण्यात आली. त्यावेळी रेहमान आणि रिजवान यांचा यज्ञशाळेमध्ये ब्राम्हणांनी सन्मान केला. सावित्री यांनी सांगितले की, चांगले मानधन त्यांना मिळते आणि एकूलत्या मुलीचेही लग्न झाले आहे. त्यामुळे आता मी निश्चिंत राहून काम करू शकते.

याबाबत सावित्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षांपुर्वी या गावात त्यांची आई भागवती शिवलाल यांनी ईष्ट देवी सिद्धिदात्रीची दगडाची मुर्ती स्थापन केली होती. माझ्या मनात इच्छा होती की, मला जर चांगली नोकरी लागली तर मी देवीच्या मंदिराचे निर्माण करेल. मला त्याच वेळेस अंगनवाडीमध्ये नोकरी लागली आणि पहिल्या पगारातच देवीचा वटा बांधला. माझी त्यानंतर सरकारी शाळेत नियुक्ती झाली यानंतर झालेल्या पगारातून मी मंदिराच्या जीर्णोंद्धाराचे काम केले. आई-वडीलांचा काही दिवसांनी अचानक मृत्यू झाला. मी आई-वडीलांचे पिंडदान करताना संकल्प केला होता की, स्वतःचे घर बांधण्यापुर्वी सिद्धिदात्री देवीचे मंदिर बांधून आईची इच्छा पूर्ण करील. त्यामुळे माझ्या संपत्तीतून या मंदिराचे निर्माण सुरू केले.

संपुर्ण श्रद्धेने मंदिराच्या कामासाठी त्यांचे शेजारी रहमान आणि रिजवान या दोघांनी संमती दिली. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व साधन सामग्रीची व्यवस्था करण्यात आली आणि काही दिवसातच दोघांनी मंदिराचे काम पुर्ण केले. याबदल्यात त्यांनी एक रूपयाही शिक्षिकेकडून घेतला नाही. सावित्री उडके यांनी त्यांच्या या श्रद्धेवर प्रभावित होऊन 1 एकर जमीन त्यांना दान दिली.

Leave a Comment