यामुळे चीनमधील या गावातील महिला अंत्यसंस्कारावेळी करतात डान्स


जो या जगात येतो, त्याला एक ना एक दिवस आपल्या नातेवाईकांची सोबत सोडावीच लागते हा तर निसर्गाचा नियम आहे. पण ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती हे जग सोडून जाते तेव्हा त्याच्या स्वकियांच्या दुःखाला पारावर नसतो. पण या जगात असा एक देश आहे जेथे एखाद्या व्यक्तिचे निधन झाल्यानंतर महिलांना अश्लील डान्स करावा लागतो. आता तुम्ही म्हणाल काय राव तुम्ही काही देखील बातमी देत आहात. पण असे चीनमधील एका ग्रामीण भागात असेच काहीसे घडते. पण असे का घडते याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

चीनच्या काही ग्रामीण भागात एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारावेळी महिला अश्लील डान्स करतात. ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. पण आता या परंपरेने आधुनिक रूप घेतले आहे. आपल्या पतीच्या मृत्युनंतर येथील महिला स्ट्रिप डान्सर्सला बोलावतात. डान्ससोबत रडण्याचे नाटकही हे डान्सर्स करतात. मिळालेल्या माहितीनुसार येथील महिलांनी या परंपरामागे विचित्र कारण सांगितले आहे. महिलांच्या मते, असे डान्स पतिला शेवटची आणि शानदार भेट देण्यासाठी करतात.

त्यांच्यासाठी ही डान्सची परंपरा महत्वपूर्ण मानली जाते. शवपेटीच्या आसपास या महिला नृत्य करतात. सोबतच येथील लोकांचे मानने आहे की, डान्सर्सला अंत्ययात्रेत बोलविल्यानंतर लोकांची गर्दी वाढते आणि अंत्ययात्रेत जितके जास्त लोक असतील तितकाच मरणाऱ्याच्या आत्म्याला शांती मिळते. तर या परंपरेवर बंदी आणण्याचा निर्णय चीनच्या सरकारने घेतला आहे. या प्रथेबाबत 2006 आणि 2016 मध्ये चीन सरकारने कारवाई केली होती. पण यानंतरही ग्रामीण भागात ही प्रथा अद्यापही कायम आहे.

Leave a Comment