नेदरलंड मध्ये उदंड झाले पर्यटक


पर्यटन हा आज जगभरातील सरकारांना मोठा महसूल मिळवून देणारा उद्योग ठरला आहे आणि त्यामुळे बहुतेक सर्व देशांची सरकारे जाभारातील पर्यटक यावेत यासाठी पर्यटन स्थळांचा प्रसार, प्रचार करताना दिसत आहेत. पर्यटकांसाठी अनेक सोयी, सवलती सुविधांच्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र निसर्गसुंदर, शांत आणि पर्यटकांचे आवडते डेस्टीनेशन ठरलेला द नेदरलँड्स पर्यटकांपासून कशी सुटका मिळवावी या विचाराने हैराण झाला आहे. राजधानी अॅमस्टरडॅम मध्ये तर पर्यटक इतक्या प्रचंड संखेने येत आहेत की त्यामुळे पर्यटन विभागच नाही तर शहरवासी सुद्धा त्रासले आहेत.


परिणामी जगभरातील देश पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सुविधा देत असताना नेदरलँड्स मध्ये मात्र पर्यटनावरचा कर वाढविणे आणि अॅमस्टरडॅम ऐवजी अन्य पर्यटनस्थळी पर्यटक जातील यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम आखणे याला प्राधान्य दिले जात आहे. अॅमस्टरडॅममध्ये पर्यटकांची संख्या खूपच वाढल्याने गर्दी होते आहे, घरांचे दर वाढले आहेत, सार्वजनिक सुविधांवर ताण येत आहे, अव्यवस्था वाढली आहे आणि त्याचा विपरीत परिणाम नागरिकांवर होता असून त्याचे आपसातील सौहार्द कमी होत चालले आहे असे पर्यटन मंत्रालयाकडून सांगितले जात आहे.


सध्या येथे जगभरातून १.९ कोटी पर्यटक येत आहेत आणि आगामी १० वर्षात ही संख्या २.९ कोटींवर पोहोचेल असा अंदाज आहे. या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी काही योजना राबविल्या जाणार आहेत. देशात गतवर्षी पर्यटन कर लागू केला गेला आहेच पण आता पर्यटन संबंधी अनेक सेवांवर कर लावले गेले आहेत मात्र याचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही कारण पर्यटक वाढतेच आहेत यामुळे आता यंदाही पर्यटन कर वाढविला जाणार आहे. जहाजावरून सफर करण्यासाठी प्रती व्यक्ती ६५० रुपये कर आकाराला जाणार आहे.

अनेक पर्यटनस्थळांची नावे बदलली जात आहेत. उदाहरण झेंडवॉर्त बीच या अॅमस्टरडॅमपासून १८ किमीवर असलेल्या बीचचे नामकरण अॅमस्टरडॅम बीच केले गेले आहे. तसेच अॅमस्टरडॅम सिटी कार्ड डेटा मध्ये जवळपासच्या किंडरजक, विंडमिल डीस्ट्रीक्ट, रेड लाईट डीस्ट्रीक्ट, यांचा समावेश केला गेला आहे. डिस्कव्हर द सिटी अॅप मध्ये गर्दी असलेल्या ठिकाणांचे नोतीफिकेशन पर्यटकाला मिळणार आहे त्यामुळे गर्दी टाळून त्याजागी भेट देणे शक्य होणार आहे. पर्यटन विभागाचे अधिकारी म्हणतात, आम्ही पर्यटकांसाठी शहर बंद करू शकत नाही मात्र एकाचवेळी अनेकांनी येऊन गर्दी करू नये यासाठी योजना आखू शकतो आणि तेच आम्ही करत आहोत.

Leave a Comment