गाझियाबादमध्ये घरांना मिळणार आधार नंबर


उत्तरप्रदेशातील गाझियाबाद हे शहर देशातील पहिले विशेष शहर बनणार आहे कारण या शहरातील प्रत्येक घराला आधार नंबर दिला जाणार आहे. त्यात नवीन युनिक नंबरसह बारकोड असेल आणि घराच्या नंबरावरतो बसविला जाईल. शहरातील प्रत्येक घर कराच्या मर्यादेत येण्यासाठी हा उपाय राबविला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे शहर वेगाने वाढते आहे मात्र दीड लाखाहून अधिक घरे कर भरत नाहीत. त्यासाठी शासनाने रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्व्हिरोनमेंट स्टडीजकडे आधार नंबर बनविण्याची जबाबदारी सोपविली आहे. शहरात अनेक घरे अशी आहेत, जी सुविधा घेतात पण कर भरत नाहीत. या योजनेचा फायदा भविष्यात सरकारी विभागांना होणार आहे.

आधारनंबर आणि बारकोडमुळे घराचे दार न वाजविता, घरातील लोकांना त्रास न देता आवश्यक ती सर्व माहिती नगरपालिकेचे अधिकारी मिळवू शकणार आहेत. बारकोड मध्ये कोणतीही गुप्त माहिती असणार नाही तर त्या भूखंडाचे क्षेत्रफळ, कव्हर्ड एरिया, घरमालकाचे नाव, वार्षिक कर, वीज कनेक्शन, घराचा फोटो, युनिक नंबर आणि काही माहिती असेल. या साठी जिओ टॅगिंग सर्व्हे सुरु होत असून त्यापूर्वी सर्व क्षेत्राचा नकाशा तयार केला जात आहे. नकाशे तयार करण्याची जबाबदरी महसूल अधिकारी निभावणार आहेत. त्यानंतर सॅटेलाईट मॅपिंग केले जाणार असून सर्व नाकासेह या मॅप वर इम्पोज केले जातील. भविष्यात त्यामुळे घर शोधणे हा प्रकार करावा लागणार नाही. त्यासाठी एक अॅप तयार केले गेले असून अधिकारी प्रत्येक घराची माहिती त्याच्या मदतीने मिळवू शकणार आहेत.

Leave a Comment