रिलायंस रिटेल डिजिटल प्लॅटफॉर्मने जोडणार ५० लाख किराणा दुकाने


रिलायंस रिटेलने देशातील ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर ५० लाख किराणा दुकाने जोडण्याच्या योजनेची सुरवात केली असून ही योजना २०२३ पर्यंत पूर्ण केली जात आहे. बँक ऑफ अमेरिका मेरील लिंचच्या एका रिपोर्टनुसार भारतात ९० टक्के रिटेल बाजार असंघटीत असून ७०० अब्ज डॉलर्स म्हणजे ४९ लाख कोटींचा हा बाजार रिलायंस साठी मोठी संधी आहे.

देशात सध्या १५००० दुकाने या माध्यमातून जोडली गेली आहेत. मात्र देशात १० हजार रिटेल औटलेट सह रिलायंस जगातील मोठा ऑनलाईन टू ऑफलाईन इ कॉमर्स प्लॅटफॉर्म बनविण्यास्ठी काम करत आहे. सध्या जी किराणा दुकाने अन्य ई कॉमर्स कंपन्यांशी जोडली गेली आहेत त्यात ज्या व्यावसायिक दुकानदारांचा महिना टर्नओव्हर ९ लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे त्यांचा समावेश केला गेला आहे. मात्र रिलायंसने या क्षेत्रात प्रवेश केला तर मात्र कमी उत्पन असलेले किराणा व्यावसायिक त्यात सामील होऊ शकतील आणि जादा संखेने व्यापारी इ कॉमर्स साठी रजिस्ट्रेशन करतील असे तज्ञांचे मत आहे.


रिलायंस ग्राहकांना थेट जोडणार असून त्यासाठी जिओ एमपीओएस म्हणजे मोबाईल जॉइंट ऑफ सेल या डिव्हाईसचा वापर केला जाणार आहे. किराणा दुकाने ऑनलाईन डिजिटल बनविण्यासाठी जिओ डिव्हाइस लावली जातील आणि त्याला ४ जी नेटवर्कचा सपोर्ट दिला जाणार आहे. दुकानदार ग्राहकांच्या ऑर्डर स्वीकारून पार्सल करतील आणि ग्राहक याच डिव्हाईस मधून ऑनलाईन पेमेंट करू शकतील असे सांगितले जात आहे.

सध्या छोटी शहरे, गावे, नगरे येथे पीओएस डिव्हाईस देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यात स्नॅपबीट, नुक्कड शॉप यांचा समावेश असून स्नॅपबीटने देशात विविध शहरात ४५०० डिव्हायसेस इनस्टॉल केली आहेत. मात्र या क्षेत्रातील सर्व कंपन्या ही डिव्हायसेस ५० हजार रुप्यातात देत आहेत तर रिलायंस हे डिव्हाईस फक्त ३ हजार रुपयात देणार आहे असेही समजते.

Leave a Comment