केवळ एका युरोत पुर्ण होईल तुमचे घर घेण्याचे स्वप्न!


रोम (इटली) : आपल्यापैकी प्रत्येकाचे आपले स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते आणि त्यासाठी आपण जीवापाड मेहनत करतो. कारण सध्याच्या घडीला घराच्या किंमती गगनाला भिडलेल्या असल्यामुळे ते आपल्या अवाक्याच्या बाहेर असते. पण आम्ही तुम्हाला एका देशाबद्दल सांगणार आहोत जिथे चक्क एका युरोमध्ये म्हणजे भारतीय 78 रुपये 37 पैशांमध्ये घराची विक्री होत आहे. आता तुम्ही म्हणाल की काय राव फसवत आहात आम्हाला… पण हे खरे आहे कारण जगात एक असे ठिकाण आहे जिथे या एका युरोमध्ये अख्ख घर विकत मिळत आहे. ते ठिकाण इटलीतील संबुका बेट हे असून याच बेटावरील लोकांनी आपली घरे विकायला काढली असून त्यांची मूळ किंमत एक युरो म्हणजेच केवळ 78 रुपये 37 पैसे एवढी होती.

संबुका हे सुंदर बेट इटलीच्या सिसली येथे आहे. उदर्निवाहाचे साधन या बेटावर राहणाऱ्या लोकांकडे नसल्याने, त्यांची घरे त्यांना विकावी लागत आहेत. या बेटावर काही काळापूर्वीपर्यंत मोठ्याप्रमाणात लोकसंख्या होती. मात्र, 1968 मध्ये आलेल्या भूकंपानंतर तेथली परिस्थिती बदलली. औद्योगिकीकरण तसेच शहराकडे आकर्षित होऊन अनेकांनी या बेटावरुन स्थलांतर केल्यानंतर या बेटावरील लोकसंख्येत घट झाली. आता येथे हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच लोके आणि काही इमारती शिल्लक आहेत.

या बेटावरील घरांच्या विक्रीची जाहिरात या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात काढण्यात आली. त्यावेळी यांची मूळ किंमत 1 युरो एवढी ठेवण्यात आली होती. जगभरातील लोकांनी या घरांना विकत घेण्यासाठी लिलाव पद्धतीने बोली लावली गेली. या घरांसाठी इस्रायल, रशिया, ब्रिटन आणि चिलीच्या लोकांनी बोली लावली. या लिलावात सर्वात स्वस्त घर 1000 युरो म्हणजेच 78 हजार रुपयांमध्ये विकले गेले तर, सर्वात महाग घर 25 हजार युरो म्हणजेच 20 लाख रुपयांमध्ये विकले गेले.

ही घरे तुम्ही विकत घेऊ शकले नाही, म्हणून निराश होण्याची गरज नाही. कारण तेथली ही घरे आणि संबुका बेटावरील लोकांची जीवनशैली तुम्ही जवळून अनुभवू शकणार आहात. या बेटावरील काही घरे डिस्कवरी चॅनेलनेही विकत घेतली आहेत. या संबुका बेटावरील लोकांवर एक कार्यक्रम करण्याच्या विचारात डिस्कवरी आहे. ही घरे त्यासाठी विकत घेण्यात आली आहेत. संबुका बेटावरील लोकांच्या समस्या त्यांची परिस्थितीशी झुंज देण्याचा प्रवास या कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहे.

Leave a Comment