क्रिकेट वर्ल्डकप भारत पाक सामन्याला मुकणार खेळाडूंच्या सहचरी


यंदा ३० मे पासून इंग्लंडमध्ये होता असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यातील सर्वात उत्कंठापूर्ण भारत पाकिस्तान सामना टीम इंडियाच्या खेळाडूंच्या बायका, मैत्रिणी अथवा कुटुंबीय पाहू शकणार नाहीत. हा सामना १६ जूनला होत असून बीसीसीआयने जारी केलेल्या नियमानुसार खेळाडूंच्या पत्नी, मैत्रिणी वर्ल्ड कप सुरु झाल्यानंतर २१ दिवसानंतर खेळाडूंसोबत फक्त १५ दिवसांसाठी राहू शकणार आहेत. परिणामी १६ जूनच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्या टीम इंडियाच्या खेळाडूंसमवेत राहू शकणार नाहीत.

या निर्णयापूर्वी बीसीसीआयने केलेल्या विचारविनिमयात खेळाडूना त्यांचे कुटुंबीय किंवा मैत्रिणी १० ते १२ दिवस त्यांच्यासोबत राहू देण्याचे ठरविले गेले होते मात्र नंतर हा विचार बदलला गेला असे समजते. त्यामुळे नव्या निर्णयानुसार २२ जूनला होत असलेल्या अफगानिस्तान भारत सामन्यानंतर खेळाडूच्या पत्नी, मैत्रिणी किंवा परिवार त्याच्यासोबत राहू शकणार आहे. हि मुदत जास्तीत जास्त ४ ते ५ जुलै पर्यंत असेल.


टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीची पत्नी अनुष्काची स्पर्धेच्या शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहण्याची इच्छा असेल तर त्यानुसार योजना बनवावी लागेल कारण २१ दिवसांनंतर १५ दिवस सोबत राहण्याची परवानगी म्हणजे अंतिम फेरीत भारत पोहोचला तर त्यावेळी खेळाडूंचे कुटुंबीय त्यांच्यासोबत नसणारच. कारण वर्ल्ड कप सामने ५० दिवस चालणार आहेत.

विशेष म्हणजे बीसीसीआयने हा निर्णय घेताना टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीने त्याची बाजू मांडायची वाट पाहिलेली नाही. गतवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंचे परिवाराचे येणे जाणे, सामना पास याची व्यवस्था बीसीसीआयला करावी लागली होती. त्याचवेळी बीसीसीआयने ही मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. त्यावेळी बीसीसीआयला खेळाडू, त्यांचे परिवार, सहाय्यक स्टाफ अश्या ३७ जणांची व्यवस्था करावी लागली होती.

Leave a Comment