बाळासाहेबांच्या स्मारकातही टक्केवारी मागतील उद्धव ठाकरे – निलेश राणे


मुंबई – माजी खासदार निलेश राणेंनी उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकातही टक्केवारी कमीशन मागतील, अशी खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरेंवर त्यांनी ट्विटद्वारे निशाणा साधला. औरंगाबाद येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याची माहिती समोर आली होती.

ठाकरे विरुद्ध राणे हा नवा वाद निलेश राणेंच्या विधानावरुन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना आता राणेंच्या या टीकेला कशाप्रकारे प्रतिउत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक औरंगाबादमध्ये करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. निविदाही या स्मारकासाठी काढण्यात आल्या आहेत. पण, ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर निविदेसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ठेकेदार हुशार आहेत. त्यांना माहीत आहे की उद्धव ठाकरे यात पण ५ टक्के मागतील, असे खोचक ट्विट त्यांनी केले आहे.

Leave a Comment