आपल्या युझर्सना 1 लाख रूपये जिंकण्याची सुवर्ण संधी देत आहे टीकटॉक


‘टिक-टॉक’ अॅपने मद्रास उच्च न्यायालयाने बंदी हटवल्यानंतर पुन्हा एकदा अॅपल प्ले स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरमध्ये टॉप फ्रि अॅपमध्ये स्थान मिळवले आहे. स्वतः टिक-टॉकने याची घोषणा केली. कंपनीने केलेल्या जाहिरातीला या दोन्ही अॅप्लीकेशन स्टोरमध्ये मिळालेल्या यशाचे श्रेय जाते. म्हणून आता टिक-टॉक आपल्या युझर्सना 1 लाख रूपये जिंकण्याची संधी देत आहे. युझर्सना यासाठी आपल्या सोशल मिडियाद्वारे #Returnofटीकटॉक मायक्रोसाइट ही लिंक शेअर करावी लागेल. या मायक्रोसाइटद्वारे अँड्रॉइड आणि iOS सिस्टीममध्ये अॅप डाउनलोड करण्यासाठी एक लिंक उपलब्ध होते.

याबाबत माहिती देताना टिक-टॉक इंडियाचे एंटरटेनमेंट स्ट्रॅटिजी आणि पार्टनरशिप प्रमुख सुमेधास राजगोपाल यांनी सांगितले की, आम्हाला भारतातील 200 मिलियनपेक्षा जास्त युझर्सनी दिलेल्या प्रेम आणि समर्थनासाठी खूप आभारी आहोत. यामुळे टिक-टॉकवर अधिक लोक जोडण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही सध्या टिक-टॉक युझर्सच्या सुरक्षेवर काम करत आहोत.

Leave a Comment