गिनीज बुकमध्ये नोंद असलेल्या देवेंद्रचा जगण्याचा संघर्ष अजूनही सुरूच!


आपले जग हे आश्चर्याने भरलेले आहे. त्यातच आम्ही तुम्हाला या आश्चर्यांबद्दल वारंवार माहिती देतच असतो. पण आम्ही आज तुम्हाला जी माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्हाला अभिमान वाटलेच त्याचसोबत तुम्हाला दुःख देखील वाटेल. कारण त्या व्यक्तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद असून देखील त्याच्या जगण्याचा संघर्ष अद्याप सुरुच आहे.

आपल्या देशात एक अशी व्यक्ति आहे ज्याच्या हात पायांना चक्क 7-7 बोटे असून त्या व्यक्तिचे नाव देवेंद्र सूथर असे आहे. त्याच्या याच विलक्षणपणामुळे त्याच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. देवेंद्रला मॅक्सिमम फिंगर्स मॅन असे देखील म्हटले जाते. गुजरातच्या हिंमतनगरचा रहिवाशी असलेल्या देवेंद्रला जन्मापासूनच पॉलीडॅक्टली नावाचा आजार आहे. पण त्याला याचे अजिबात दु:ख नाही. तो या आजारामुळे त्रस्त आहे, पण निराश नसल्याचे तो म्हणतो.

देवेंद्रला एकूण २८ बोटे आहेत. ७व्या किंवा ८व्या महिन्यात गर्भात भ्रूणात जास्त बोटे विकसित होतात. एका आकडेवारीनुसार, जगभरात ७०० ते १००० मध्ये अशी एक केस असते. पण याची माहिती प्रेग्नेंसी दरम्यान अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून मिळवता येते. बॉस्टन चिल्ड्रेन हॉस्पिटलनुसार, अशा केसेस विकसित देशांमध्ये समोर आल्यावर आणि बाळ दोन महिन्यांचे झाल्यावर सर्जरीच्या माध्यमातून त्यांची अधिकची बोटे काढली जातात. अशा स्थितीतही देवेंद्र निराश नाही. त्याला दोन अपत्ये आहेत आणि तो सुतारकाम करतो. त्याला बुट विकत घेताना अडचणीचा सामना करावा लागतो.

भारतात अक्षतमध्ये अशीच एक केस बघण्यात आली होती. त्याच्याही हाता-पायांना ७-७ बोटे होती. आणि २०१० मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आले होते. पण त्यानंतर त्याची बोटे सर्जरी करून काढण्यात आली होती. त्यामुळे सध्या हा रेकॉर्ड देवेंद्रच्या नावावर आहे.
गिनीज बुकमध्ये नाव गेल्याने देवेंद्रला जगभरात प्रसिद्धी तर मिळाली, पण काही आर्थिक मदत त्याला मिळाली नाही. त्यामुळेच तो सर्जरी करू शकला नाही. आता वाढत्या वयानुसार त्याची बोटे आणखी कठोर होत असल्यामुळे त्याला काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Leave a Comment