ब्रिटीश युवराजच्या जन्मदिनी जन्मलेल्या मुलांना अनोखी भेट


ब्रिटीश राजघराण्यात ड्युक ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि डचेस मेगन मर्केल यांना ५ मे रोजी पुत्ररत्न झाल्याची घोषणा झाल्यावर जगभरातून त्यांच्यावर अभिनंदन आणि भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. अमेरिकेतील सानफ्रान्सिस्को मधल्या कॅलिफोर्निया पॅसिफिक मेडिकल सेंटरने मात्र अनोख्या रीतीने राजपुत्राचा जन्माचा आनंद व्यक्त केला आहे. या हॉस्पिटलने ५ मे रोजी म्हणजे राजपुत्राच्या जन्मादिवशीच त्यांच्या येथे जन्माला आलेल्या ९ बाळाना सोनेरी मुकुट चढवून जन्मसोहळा साजरा केला आहे. या निमित्ताने रॉयल बेबीचा जन्मदिवस अविस्मरणीय केला गेला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार या हॉस्पिटल मध्ये काम करत असलेल्या नर्स जून शिरकी यांनी हाताने सोनेरी लोकरीने विणलेली खास टोपडी ५ मे रोजी जन्मलेल्या बाळांच्या डोक्यावर घातली. येथील स्टाफने तसा निर्णय घेतला होता. या दिवशी या हॉस्पिटल मध्ये ९ मुले जन्माला आली. सोशल मिडियावर हे सोनेरी मुकुट चढविलेल्या बाळांचे फोटो शेअर केले गेले आणि सानफ्रान्सिस्को मधील ब्रिटीश दुतावासाने त्याबद्दल या हॉस्पिटलचे कौतुक केले.

जून शिराकी ही नर्स गेली सात वर्षे नवजात बालकांना लोकरीची टोपडी स्वतः विणून घालते आहे. यावेळी तिने सोनेरी लोकरीची टोपडी विणली कारण या दिवशी युवराज जन्माला आला होता. मेगन मर्केल अमेरिकन नागरिक आहे त्यामुळे राजपुत्र अर्ची हॅरीसन माउंटबॅटन ला ब्रिटीश तसेच अमेरिकन नागरिकत्व जन्माबरोबरच मिळाले आहे.

Leave a Comment