याही कारणांनी येतो मृत्यू


आयुष्य एकदाच मिळते त्यामुळे ते मनसोक्त जगा असा सल्ला अनेक विचारवंत नेहमी देतात. कारण जगातील एकमेव सत्य आहे तो मृत्यू. जन्माला कोण कधी येणार हे कदाचित सांगता येणार नाही पण जन्माला आलेला मृत्यू पावणार हे नक्की असते तरीही लोकांच्या मनात मृत्यूबद्दल खूप भीती असते. मृत्यू येण्याची अनेक कारणे असतात. पण त्यातील काही कारणे आपल्याला माहिती नसतात. त्याची माहिती येथे देत आहोत.


वार्धक्य हे मृत्यूचे मुख्य कारण आहे. पण आपल्याला हे माहिती नसते, वार्धक्याने कधीच कुणी मरत नाही तर वार्धक्यामुळे होणाऱ्या व्याधी मृत्यूस कारणीभूत असतात. मातीपेक्षा पाण्यात प्रेत ४ पटीने लवकर खराब होते आणि प्रेताला अग्नी देण्याची प्रथा तीन लाख वर्षे अस्तित्वात आहे. डोक्यात नारळ पडल्याने दरवषी १५० लोकांना जीव गमवावा लागतो.


माणसाचे डोके कापले तर तो त्यापुढे २० सेकंद जिवंत राहू शकतो पण डोक्यात गोळी घातली गेली तर त्वरित मारतो. अर्थात नियमाला अपवाद आहेत तसे हे नेहमी असेच घडते असे नाही. कधी कधी डोक्यात गोळी गेलेला माणूस जिवंत राहू शकतो.


डॉक्टर लोकांच्या खराब हस्ताक्षरामुळे दरवर्षी ७ हजार लोकांचा जीव जातो असे संशोधनात दिसून आले आहे. डाव्या हाताने लिहिणाऱ्या माणसाना उजव्या हाताने लिहिणाऱ्याच्या तुलनेत तीन वर्षे अगोदर मृत्यू येतो. पहाटे तीन ते चार या वेळात सर्वाधिक मृत्यू होतात. ज्यावेळी तुमचा मृत्यू होतो तेव्हा त्याचवेळी जगात १,५९,६३५ लोक शेवटचा श्वास घेतात.


माणसाच्या पोटातील काही जंतू खाल्लेले अन्न पचन होण्यासाठी मदत करत असतात. माणूस जेव्हा मरतो तेव्हा तीन दिवस उलटले की हेच जंतू शरीराला आतून खायला सुरवात करतात. शार्कच्या हल्ल्यात जगभरात दरवर्षी १२ लोक ठार होतात, आपण मात्र दर तासाला ११ हजार शार्क ठार करत असतो. भारतात दर तासाला एक महिला हुंडाबळी ठरते. जे आजार सहज बरे होऊ शकतात त्यामुळेही दरवर्षी ४ लाख माणसे मरतात. पहिल्या महायुद्धात ४ कोटी लोक ठार झाले होते तर दुसऱ्या महायुद्धात ही संख्या ६ कोटी होती.

Leave a Comment