भाईजान सलमान बनणार कुवांरा बाप


वयाच्या ५३ व्या वर्षातही बॉलीवूड मध्ये आजही मोस्ट एलिजिबल बॅचलर असलेल्या आणि ज्याच्या लग्नाची चर्चा वारंवार होते पण प्रत्यक्षात काहीच निष्पन्न होत नाही असा दबंग भाईजान सलमान पिता बनण्याचा विचार गंभीरपणे करतो आहे. सलमानचे लग्न कधी होणार याला अजूनतरी उत्तर नाही पण म्हणून तो पिता बनू शकत नाही असेही काही नाही. सलमानला लहान मुलांची खूप आवड आहे आणि त्यामुळे त्याने सरोगसी पद्धतीचा वापर करून पिता बनण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. याचा सरळ अर्थ असा की भाईजान कुंवारा बाप बनणार आहे.

सलमानचे लहान मुलांबद्दल असलेले प्रेम अनेकदा दिसले आहे. मात्र लग्नाबाबत त्याचा निर्णय होत नाही. आजपर्यत त्याची अनेक अफेअर चर्चेत आली आहेत. अभिनेत्री संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ आणि अलीकडे लुलीया वन्तूर अशी ही यादी आहे. ती आणखी मोठी असू शकते. सलमानचे वडील सलीम यांनी सलमान लग्न करण्यास तयार होत नसल्याचे कारण त्याच्या कुटुंबीयांवर असलेले प्रेम असल्याचे सांगितले होते. सलीम म्हणाले होते, सलमान प्रत्येक मुलीत त्याच्या आईची प्रतिमा शोधतो आणि त्यामुळेच तो लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही.

सलमानने सरोगसीच्या मदतीने पिता बनण्याचा निर्णय घेतला आहे आणि असा निर्णय घेणारा तो पहिला कलाकार नाही. यापूर्वी आमीर खान, शाहरुख खान, करन जोहर, तुषार कपूर, एकता कपूर, सनी लीयोनी यांनी हा पायंडा पाडला आहेच. सलमानचा भारत येत्या ६ जूनला ईदच्या दिवशी प्रदर्शित होत आहे.

Leave a Comment