तुरुंगाबाहेर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी


मुंबई- मुंबईमध्ये 80-90 च्या दशकात आपले राज्य गाजवणारा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला फर्लो रजा मंजूर झाली झाली आहे. 28 दिवसांची फर्लो रजा कुटुंबाला भेटण्यासाठी गवळीला मिळाली आहे. रजेसाठी अरुण गवळीच्या वकिलाकडून अर्ज करण्यात आला होता, सरकारी वकिलांकडून त्यावर आक्षेपदेखील घेण्यात आला होता. अखेर मुंबईतील निवडणूक झाल्यानंतर त्याची सुटी मंजूर करावी, असा आदेश नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर अरुण गवळी काल तुरुंगाबाहेर आला आहे.

अरुण गवळी नागपूरच्या तुरुंगात शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी सध्या शिक्षा भोगत आहे. मुंबईतील मतदान संपल्यानंतर त्याला सुटी मिळाली आहे. यापूर्वीही 6 वेळा सुटीवर जाऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान न करता अरुण गवळी वेळेवर तुरुंगात परतला होता.

Leave a Comment