‘शुभ मंगल सावधान’च्या सिक्वलमध्ये समलैंगिक युवाची कथा


‘विकी डोनर’,’शुभ मंगल सावधान’, ‘अंधाधून’, ‘बधाई हो’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता आयुष्यमान खुराना हा सध्या चांगलाच फॉर्मममध्ये असून त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याचबरोबर या चित्रपटांनी प्रेक्षक आणि समीक्षकांची भरभरून प्रशंसा मिळवली. आता आयुष्यमानने भूमिका साकारलेल्या ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाचा सिक्वल तुमच्या भेटीसाठी येत आहे.


आयुष्यमानच्या ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे. तसेच ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ असे या चित्रपटाचे नाव असल्याचे देखील सांगितले आहे. ऑगस्ट महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करण्यात येणार असून हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. आनंद एल. राय करणार आयुष्यमानच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आहेत. पण आयुष्यमानसोबत चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे अद्याप समोर आलेले नाही. एका समलैंगिक युवाची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तर LGBTQ आणि कलम ३७७ या विषयांवर भाष्य करण्यात येणार आहे.

आयुष्यमान ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाबद्दल म्हणतो की सर्वांच्या मनाला भावणारी अशा चित्रपटाची कथा आहे. तसेच हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद देखील असणार आहे. चित्रपटाची कथा ही एक कॉमेडी अंदाजात असणार असल्याचेही आयुष्यमान म्हणाला.

Leave a Comment