नवा ‘ड्रामा’ करुन ट्रोल झाली राखी सावंत


पुन्हा एकदा बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत चर्चेत असून राखीने कोणतेही उपद्व्याप करत प्रसिद्धीझोतात राहायचे ही कला चांगलीच अवगत केली. पण तिची ही ‘कला’ यावेळी तिच्यावरच उलटली आणि सोशल मीडियावर राखी चांगलीच ट्रोल झाली.


आपल्या सोशल अकाऊंटवर राखी सावंतने एक फोटो शेअर केला आहे. ती पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजासोबत या फोटोत पोज देताना दिसत आहे. हा फोटो राखीने शेअर केला आणि लोक भडकले. राखीला त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. लोकांचा हा संताप पाहून आपले काही तरी चुकले, हे लगेच राखीच्या लक्षात आले आणि यावर तिने खुलासा केला. आपल्या आगामी चित्रपटाच्या सेटवरचा हा फोटो असल्याचे तिने सांगितले.


माझा भारत देश मला खूप आवडतो. पण माझ्या ‘धारा 370’ या चित्रपटातील हा एक सीन आहे,’ असे राखीने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे. यासंदर्भातील तिने एक व्हिडीओही शेअर केला आहे. ‘हाय फ्रेन्ड्स, हा एक पाकिस्तानी सेटअप आहे. या चित्रपटाचे नाव ‘धारा 370’ आहे. हा चित्रपट काश्मीरी पंडितांवर आधारित आहे. मी पाकिस्तानी मुलीची भूमिका या चित्रपटात साकारते आहे. तुम्ही माझा कॉस्च्युम बघू शकता. यात मी दहशतवादी संघटनांचा पर्दाफाश करणार आहे, असे तिने या व्हिडीओत म्हटले आहे.


हे फोटो आणि व्हिडीओ राखीने शेअर केले आहेत आणि सोशल मीडियावर जणू संतापाची लाट आली. हे पाहून पाकिस्तानीही भडकले. संबरीना खमीसा नामक पाकिस्तानी मुलीने राखीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया दिली. इस्लामला पाकिस्तान फॉलो करते आणि हा अतिशय पवित्र व शांतीप्रिय धर्म आहे. पाकिस्तानचा मला गर्व आहे. माझ्या संस्कृतीवर प्रेम आहे, असे तिने लिहिले. राखीने या मुलीला लगेच उत्तर दिले. माझा हा चित्रपट आहे. तुला आवडला नसेल तर तू माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जाऊ शकतेस, असे तिने सुनावले.