मुंबईतील चौथीच्या विद्यार्थ्यांने बनवले आरोग्यविषयक अॅप


मुलांना ज्या वयामध्ये कॉम्प्यूटरवर चित्र काढणे आणि गेम खेळायला आवडतात त्याच वयात एका मुलाने आरोग्य विषयक अॅप तयार केले आहे. मुंबईतील व्योम बग्रेचा या नऊ वर्षाच्या मुलाने हेल्थ अॅप बनवले आहे. जे अँड्रॉइड वापरकर्ते गूगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. सध्या पार्किंगशी संबंधित असलेल्या अॅप्लिकेशनवर मुंबईच्या नाहर इंटरनॅशनल स्कूलमधील चौथ्या वर्गात शिकणारा व्योम काम करीत आहे. त्याला मोठे झाल्यावर रोबोट्सची कोडिंग करायची आहे. पर्यावरण जतन करण्यासाठी जे उपयुक्त ठरेल.

व्योमला शाळेत जायला सुरूवात केल्यापासूनच संगणक कसे काम करते याविषयी जाणून घ्यायची आवड होती, त्याच्या आईने म्हणूनच त्यांना व्हाइट हॅट जूनियरच्या ऑनलाइन कोडिंग प्रोग्राममध्ये दाखल केले. व्हाईट हॅट ज्युनिअर हे कोडिंग प्लॅटफॉर्म आहे लहान मुलांना लक्षात घेऊन जे डिझाइन केले आहे.

व्हाइट हॅट जुनिअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण बजाज यांनी सांगितले की, खूपच कमी विद्यालयांमध्ये औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान गणित शिकवले जात होते आणि जो पर्यंत याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करेपर्यंत खूप बेकारी होती. कोडींगच्या बाबतीत सुद्धा मला असेच काही घडताना दिसत आहे. मला असे वाटते की कोडिंग हा अभ्यासक्रमाचा भाग असावा. व्योम हेल्थ ऍप एक सामान्य हेल्थ टूल आहे, ज्यामध्ये एक लीटरमध्ये किती ग्लास पाणी येईल, असे फीचर्स उपलब्ध आहेत. मुले सर्व प्रकारच्या गोष्टी ऑनलाइन बनवत आहेत.

व्हाईट हॅट जूनियरच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर असे दिसून येईल की १० वर्षाच्या लहान मुलांनी साधे रेखा-चित्र ते गेम्स सुद्धा विकसित केले आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर १२ वर्षाच्या सान्वीने १२ सेशन पूर्ण केले आहेत. ते पुढे म्हणाले कि अॅप आणि गेम तिला विकसित करायचे आहेत, कारण कोडिंग आता त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे.

Leave a Comment