चौकटीबाहेरच्या भूमिकेत श्रेयस तळपदे


अभिनेता श्रेयस तळपदेचा ‘सेटर्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून श्रेयस या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत असून पहिल्यांदाच ही भूमिका आजपर्यंतच्या हास्यात्मक भूमिकेतून प्रेक्षकांना हसवणाऱ्या श्रेयसने साकारून आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा नकारात्मक भूमिकेसाठी अथक प्रयत्न केल्याचे या चित्रपटातून दिसून येत आहे.

श्रेयसने हिंदी चित्रपटसृष्टीत नागेश कुकुनूरच्या २००५ मधील इकबाल या चित्रपटामधून पदार्पण केले. हिंदी सिनेसृष्टीला त्यावेळी त्याने आपल्या अभिनयाने पछाडले होते. श्रेयसने अलिकडच्या वर्षांत गोलमाल सिरीजमध्ये दुय्यम तर कधी तृतिय़दर्शी भूमिका साकारल्या आहेत. श्रेयस नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सेटर्स’मध्ये अपूर्वची भूमिका साकारताना दिसत आहे आणि त्याने त्यात या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसत आहे.

आजपर्यंतच्या श्रेयसच्या चित्रपटांचा विचार करता त्याने साकारलेल्या प्रत्येक पात्राला न्याय दिला आहे. त्याची गुणवत्ता त्याने प्रत्येकवेळी सिध्द केली आहे. श्रेयसच्या इकबालमधील मूक पात्राने प्रेक्षकांना आत्मप्रेरक करत आश्चर्यचकित केले. श्रेयसने ‘सेटर्स’मधून आपल्या अभिनयाच्या पातळीला उंचावले आहे. त्यामुळे ‘सेटर्स’मधील त्याची ही वेगळी भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

Leave a Comment