प्रियांका, ममतांना सुषमांचे ट्विटर वरून सडेतोड उत्तर


कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि बंगालच्या मुक्यामंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानांना केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटर वरून खणखणीत प्रत्युतर दिले आहे. मंगळवारी केलेल्या या ट्विटवरून सुषमा यांनी प्रियांका गांधी यांनी मोदींना दुर्योधन असे संबोधित केल्यानंतर सुषमा यांनी त्यांना आठवण करून देताना संसदेतील एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे. त्या लिहितात, मोदी दुर्योधनासारखे अहंकारी आहेत असे आपण म्हणता तेव्हा तुम्हाला आठवण करून देते, अहंकाराची पराकाष्ठा तेव्हा झाली होती, जेव्हा राहुल गांधी यांनी त्यांच्याच पंतप्रधानांचा म्हणजे मनमोहन सिंग यांचा अपमान करून राष्ट्रपतींनी जारी केलेल्या अध्यादेश भर लोकसभेत फाडून फेकला होता. अहंकाराबद्दल कोण कुणाला सांगतेय?


दुसऱ्या ट्विटमध्ये सुषमा यांनी ममतांना फटकारले आहे. त्या लिहितात, तुम्ही आज सगळ्याची हद्द केली आहे. तुम्ही बंगालच्या मुख्यमंत्री आहात आणि मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. उद्या त्यांच्याशीच तुम्हाला बोलावे लागणार आहे. सुषमा यांनी बशीर बद्र याचा एक शेर ममतांसाठी वापरला आहे. दुष्मनी जम कर करो लेकीन गुंजाईश राहे, जब कभी हम दोस्त हो जाये, तो शरमिंदा ना हो.

प्रियांका यांनी अंबालामध्ये सभेत बोलताना मोदींवर हल्ला चढविताना ते दुर्योधनासारखे अहंकारी आहेत आणि तिच्या कुटुंबातील शहीदांचा अपमान करत आहेत असे म्हटले होते तर ममतादिदींनी मी पगार घेत नाही, पेन्शन घेत नाही, पुस्तके लिहून पैसे मिळविते, मला पैशांची गरज नाही. मात्र मोदी बंगाल मध्ये येऊन ममता सरकारकडून पैसे घेते असे म्हणतात, तेव्हा ऐसा लगता है, मोदीको जोर से गणतंत्रका थप्पड मारूँ असे विधान केले होते.