दगडूशेठ गणपतीला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर तब्बल ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य


पुणे – अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहुर्त असून सोने या मुहूर्तावर खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. तसेच याच दिवसापासून आंबे खाण्यास देखील सुरूवात करतात. पुण्यातील दगडूशेठ गणपतीला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर तब्बल ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य ठेवण्यात आला आहे. हापूस आंबे श्रीगणेशाच्या मूर्तीच्या सभोवताली सर्व दिशांना ठेवण्यात आले आहेत.

फळांचा राजा हापूस आंब्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष महत्व असते. म्हणूनच अक्षय्य तृतीयेला बाप्पाला आंब्याचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. आंब्यांच्या राशीतले गणेशाचे दर्शन या मुहूर्तावर घेण्यासाठी मंगळवारी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक वर्षे ही परंपरा कायम आहे.