मास्टरकार्ड १ अब्ज डॉलर्स भारतात गुंतवणार


मास्टरकार्ड भारतात २०१९ ते २०२४ या पाच वर्षाच्या काळात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून २०१४ ते २०१९ या काळातही कंपनीने भारतात १ अब्ज डॉलर्स गुताविले आहेत. भारतने डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याची घोषणा केल्यावर मास्टरकार्डनी ही दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. कंपनीच्या म्हणण्यानुसार यातून कंपनीची भारताच्या बाजाराबद्दलची प्रतिबद्धता दिसून येत आहे.

मास्टरकार्ड भारतात स्थानिक देवघेव प्रोसेसिंग सेंटर स्थापन करणार असून असे केंद्र स्थापन करणारी पहिली आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. यातून एटीएम देवघेव, पीओएस ट्रांझॅक्शन, इ कॉमर्स देणी अश्या अनेक सेवांचे प्रोसेसिंग भारतात होणार आहे. कंपनीची नवी गुंतवणूक भारतात कंपनीच्या क्षमतेचा विस्तार करण्यासाठी आणि सेवा देण्याचे काम अधिक वेगाने होण्यासाठी मदतीची ठरेल. मास्टरकार्डने सरकारच्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया योजनेबाबत प्रतिबद्ध असल्याने नवी गुंतवणूक व्यवसाय वाढीसाठी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार २०१२ मध्ये मास्टरकार्ड स्वीकारणारे भारतात १२ लाख व्यावसयिक होते त्यात वाढ होत असून २०२० पर्यंत या व्यावसायिकांची संख्या १ कोटीवर नेण्याचे उदिष्ट ठेवले गेले आहे. कंपनी स्मार्टसिटी योजनेतही भागीदार असून २०१३ साली भारतात कंपनीचे फक्त २९ कर्मचारी होते ती संख्या आता २ हजारावर गेली आहे.

Leave a Comment