मॉब लिचिंगचे राजीव गांधी हे जनक – भाजप प्रवक्ते


नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींचा जीवनप्रवास भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात संपला, असे वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. मोदींच्या या वक्तव्यावरुन वाद सुरु असतानाच राजीव गांधीबद्दल एक वादग्रस्त ट्विट भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन केले आहे. राजीव गांधी हे मॉब लिचिंगचे जनक असल्याच्या आशयच्या होर्डिंग्जचा फोटो बग्गा यांनी ट्विट केला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष सहभागी नव्हता असा दावा मागील वर्षी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात केल्यानंतर बग्गा यांनी अवघ्या काही दिवसांमध्येच ऑगस्ट महिन्यात राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग अशी दिल्लीमध्ये होर्डिंग लावली होती. त्यांनी आता त्याच होर्डिंगचा फोटो पुन्हा पंतप्रधानांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर ट्विट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये राजीव गांधी हे तुमच्यासाठी… असे त्यांनी म्हटले आहे.


राजीव गांधी यांना भारताचे सर्वात मोठे मॉब लिचर, असे पंजाबमधील अकाली दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते मंजिंदर सिंग सिरसा यांनाही म्हटले आहे. राजीव गांधींवर पंतप्रधान मोदींनी केलेली भ्रष्टाचारी नंबर वन ही टिका योग्य असल्याचे समर्थन करताना हे वक्तव्य सिरसा यांनी केले आहे. पंतप्रधानांनी राजीव गांधींना नंबर एकचे भ्रष्टाचारी म्हटले आहे ते खरेच आहे. भ्रष्ट असण्याबरोबरच राजीव गांधी भारतातील नंबर एकचे मॉब लिचर होते, अशी टिका सिरसा यांनी केली आहे.

Leave a Comment