क्रिप्टो करन्सी आणण्याच्या विचारात फेसबुक


सॅन फ्रान्सिस्को – क्रिप्टो करन्सीआधारित प्रणाली आणण्याची योजना सोशल मीडिया कंपनी फेसबुक तयार करत आहे. जगभरात कंपनीचे कोट्यवधी युजर आहेत, हे चलन त्यांच्यासाठी उपयोगी पडेल.

हे वृत्त अमेरिकी वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केले आहे. बिटकॉइनप्रमाणेच डिजिटल कॉइनचा यामध्ये उपयोग होईल मात्र, हा थोडा वेगळा असेल. फेसबुकचा मुख्य उद्देश याचे मूल्य स्थिर ठेवणे असेल. वॉल स्ट्रीट जर्नलने त्यांच्या अहवालामध्ये या प्रकरणाशी संबंधित लोकांचा हवाला दिला आहे. फेसबुक नेटवर्कला सादर करण्यासाठी डझनभर वित्त सेवा देणाऱ्या कंपन्या आणि अॉनलाइन मर्चंटची नियुक्ती करत असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. सध्या आम्ही आभासी चलन प्राैद्योगिकीसाठी विविध उपायांचा शोध घेत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.

Leave a Comment